आज आढळले 37 कोरोना बाधित
पाथर्डी । वीरभूमी - 06-Oct, 2020, 12:00 AM
मंगळवार दि. 6 ऑक्टोबर रोजी पाथर्डी शहरासह तालुक्यात 37 जणांचे अहवाल रॅपिड अँटीजन व खाजगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचणी अहवालातून पॉझिटिव्ह आले आहेत.
तर आज 17 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. महेंद्र बांगर यांनी दिली आहे.
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये पाथर्डी शहरातील शिक्षक कॉलनी 6, विजयनगर 1, कसबा पेठ 1, इंदिरानगर 1, जैन गल्ली 1 असे एकूण 10 कोरोना बाधित आढळले.
तर तालुक्यातील अकोला 2, खरवंडी कासार 3, शिरसाटवाडी 1, डमाळवाडी 2, जांभळी 1, पागोरी पिंपळगाव 1, भारजवाडी 1, केळवंडी 1, हिवरे 1, फुंदेटाकळी 3, भुतेटाकळी 2, मिरी 1, तनपुरवाडी 1, कीर्तनवाडी 1, ढाकणवाडी 4, मालेवाडी 1, पारगाव 1 असे 27 कोरोना बाधित आढळले.
पाथर्डी शहरासह ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांवर कोरोना पोहचला आहे. नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, घराबाहेर जातांना तोंडाला मास्क लावावा. व सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
WVrOadpESXqfIu