श्रीगोंद्यात बुधवारी १८ जण संक्रमित
श्रीगोंदा । वीरभूमी - 07-Oct, 2020, 12:00 AM
बुधवार दि.७ रोजी १२९ रॅपिड अँटीजन चाचण्या व ५० जणांचे घशातील स्राव घेतले. रॅपिड चाचण्यांत १६ जण पॉझिटिव्ह आले.तर नगर येथून आलेल्या घशातील स्रावांच्या अहवालात २ जण संक्रमित आढळले. आत्तापर्यंत एकूण रुग्णांची संख्या १८८८ झाली आहे.
दि.७ रोजी २० जण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत १६८८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ३३ जणांचा बळी गेला आहे. सद्यस्थितीला ५८ जण कोविड केंद्रात उपचार घेत आहेत तर खाजगी हॉस्पिटलमध्ये १०९ जण उपचार घेत आहेत.
दि. ७ रोजी श्रीगोंदा शहरात ७ जण पॉझिटिव्ह आले. कुंभारगल्ली-३, बनकर मळा-१, दत्तवाडी-१, तहसील कार्यालय-१, श्रीगोंदा पोलीस ठाणे येथे १ कर्मचारी संक्रमित आढळला. तर ग्रामीण भागात पिंपळगाव पिसा-५, कोळगाव-२, काष्टी-२, घारगाव-१ व बेलवंडी बुद्रुक येथे १ जण संक्रमित आला. अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.
RxlIjPLOWzXyBS