पाथर्डी । वीरभूमी - 10-Oct, 2020, 12:00 AM
शनिवार दि. 10 ऑक्टोबर रोजी पाथर्डी शहरासह तालुक्यात 65 कोरोना बाधित रुग्ण आढळले तर 66 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या बाधितांपैके 1 जण शेवगाव येथील आहे.
पाथर्डी शहरासह तालुक्यात करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजन व खाजगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचणी अहवालातून आज 65 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. महेंद्र बांगर यांनी दिली आहे.
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील नाथनगर 2, कसबा पेठ 1, एडके कॉलनी 1, आनंदनगर 2, चिंचपूर रोड 1, मुंढेनगर 1 असे एकूण 8 कोरोना बाधित आढळले.
तर तालुक्यातील जांभळी 7, मोहोज देवढे 1, पागोरी पिंपळगाव 1, दैत्यनांदूर 2, मोहटा 1, चिंचपूर इजदे 2, बाभूळगाव 1, हत्राळ 2, कळसपिंप्री 1, मिडसांगवी 5, डमाळवाडी 1, मिरी 8, केशव शिंगवे 1, हनुमान टाकळी 4, तिसगाव 3, कासार पिंपळगाव 2, भवारवाडी 1, राघु हिवरे 1, कारेगाव 1, मोहरी 1, ढवळेवाडी 2, सांगवी बुद्रुक 7, खोजेवाडी 1 असे 56 बाधित आढळले तर शेवगाव 1 असे एकूण 65 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, घराबाहेर जातांना तोंडाला मास्क लावावा. व सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, तसेच लक्षणे आढळल्यास तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
uhkyENgwmIzp