ताजनापूर उपसा जलसिंचन योजनेच्या 216 लाभार्थ्यांना पाणी उचल परवानगी पत्राचे वाटप
शेवगाव । वीरभूमी - 11-Oct, 2020, 12:00 AM
शेवगाव तालुक्यातील जिरायत भागाचे नंदनवन करणार्या ताजनापूर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी लाभार्थी शेतकर्यांच्या शेतात ठिबक सिंचनच्या माध्यमातून पोहचणार आहे. शनिवारी शेवगाव बाजार समितीच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, औरंगाबादचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे व माजी आ. चंद्रशेखर घुले यांच्या उपस्थितीत लाभार्थी 216 शेतकर्यांना प्रकल्पातून पाणी उचलण्याची परवानगी पत्राचे वाटप करण्यात आले.
जायकवाडी धरणाच्या उभारणीसाठी जमिणी गेलेल्या शेवगाव तालुक्यातील शेतकर्यांच्या शेती पिकांना ठिबक सिंचनद्वारे पाणी मिळावे यासाठी दूरदृष्टी ठेवून माजी आ. नरेंद्र घुले पाटील यांनी राज्य सरकारकडून ताजनापूर सुक्ष्म जलसिंचन उपसा योजना मंजूर करून घेतली. या योजनेद्वारे लाभधारक शेतकर्यांना ठिबक सिंचनच्या माध्यमातून पाणी मिळण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील यांनी योजना पूर्णत्वास नेहण्यासाठी पंपहाऊस, वीज उपकेंद्राची उभारणी, पाईपलाईन आदी कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला.
मात्र शेतकर्यांना ताजनापूरच्या पाण्याची प्रतिक्षा लागून राहीली होती. त्याची आज शनिवारी लाभार्थी 216 शेतकर्यांना उपसा जलसिंचन योजनेतून पाणी मिळण्यासाठी परवानगी पत्राचे वाटप करण्यात आले. या मंजुरी पत्राचे वाटप लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, औरंगाबादचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे, माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील यांच्या हस्ते शेवगाव बाजार समितीच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात वाटप करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले, ज्ञानेश्वरचे ज्येष्ठ संचालक काकासाहेब नरवडे, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, बाजार समिती सभापती अॅड. अनिल मडके, माजी सभापती संजय फडके आदीसह लाभधारक शेतकरी उपस्थित होते.
YSMywmkWUrTDVO