जामखेड । वीरभूमी - 13-Oct, 2020, 12:00 AM
महाविकास आघाडी सरकारने मंदिर आणि मस्जिद उघडण्यासाठी जामखेड येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने खर्डा चौक व शनी चौक या ठिकाणी मंदिर आणि मस्जिद समोर निषेध आंदोलन करण्यात आले.
अनलॉकमध्ये महाराष्ट्रात बहुतांश व्यवसाय आणि सार्वजनिक सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. बार आणि रेस्टॉरंट यांना देखील उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली मात्र अजुनही मंदिर आणि मज्जिद बंद आहेत. राज्य सरकारने अद्यापही धार्मिक स्थळे खुली केलेली नाहीत. याचविरोधात जामखेड येथे आज भाजपच्या वतीने मंदिर आणि मज्जिद उघडा आंदोलन केले.
यावेळ भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, सभापती रवी सुरवसे, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, अल्पसंख्या मोर्चा जिल्हाध्यक्ष अमजदभाई पठाण, उपाध्यक्ष शाकिर खान, अँड. प्रविन सानप, युवा मोर्चा अध्यक्ष पै शरद कार्ले, शहर अध्यक्ष नगरसेवक बिभिषण धनवडे, नगरसेवक आमित चिंतामनी, युवामोर्चा शहर अध्यक्ष अभयराजे राळेभात, जिल्हा परिषद सदस्य, सोमनाथ पाचरणे, आनिल लोखंडे, बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, संचालक मकरंद काशिद, धामणगाव सरपंच महारूद्र महारनवर, युवामोर्चा उपाध्यक्ष मोहन गडदे, महेश नेटके, हाबिबभाई शेख, सलिमभाई तांबोळी, अल्पसंख्या मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष फैयाजभाई शेख, तालुका अध्यक्ष कमाल शेख, युवामोर्चा तालुका सरचिटनिस शरद हजारे, आर्जुनदादा म्हेत्रे, श्रीराम डोळे, प्रविन कार्ले, आप्पा ढगे,आशिफ शेख, जैयद खान आस्लम खान, सोहेल शेख, उबेद बागवान, प्रसिद्धी प्रमुख उद्धव हुलगुंडे आदी उपस्थित होते.
LwMfiRSeHnE