पाथर्डी । वीरभूमी - 14-Oct, 2020, 12:00 AM
पाथर्डी तालुक्यात आज बुधवार दि. 14 ऑक्टोबर रोजी रॅपिड अँटीजन व खाजगी कोरोना चाचणीमध्ये पाथर्डी शहरात 05 तर तालुक्यात 45 तर नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे 1 असे एकूण 51 कोरोना बाधित आढळले.
तालुक्यातील जांभळी हे गाव कोरोना व्हाटस्पॉट ठरले असून दोन दिवसात तब्बल 25 कोरोना बाधित आढळले आहे. यामध्ये काल मंगळवारी 10 तर आज बुधवारी 15 रुग्णांचा समावेश आहे. तर कोपरे येथे प्रथमच रुग्ण आढळल्याने सुरुवातीपासून कोरोना संसर्गापासून दुर असलेले कोपरे गावही बाधितांच्या यादीत आले आहे.
आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये पाथर्डी शहरातील 1, आनंदनगर 2, लकार गल्ली 1, आनंदनगर 1 असे 5 कोरोना बाधित आढळले.
तर तालुक्यातील कोळसांगवी 2, कळसपिंपी 1, निपाणी जळगाव 1, येळी 4, पागोरी पिंपळगाव 1, तनपुरवाडी 2, मोहटे 1, हंडाळवाडी 1, कोपरे 1, तोंडोळी 1, दैत्यनांदूर 2, कामत शिंगवे 4, तिसगाव 3, जांभळी 15, डमाळवाडी 1, अकोले 1, शिंगोरी 2, माणिकदौंडी 1, चिंचपूर इजदे 1 व नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील 1 असे 51 कोरोना बाधित आढळले.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, घराबाहेर जातांना तोंडाला मास्क लावावा. व सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, तसेच लक्षणे आढळल्यास तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
xqmtBplho