दिलासादायक : श्रीगोंदा तालुक्यात शनिवारी फक्त ३ जण पॉझिटिव्ह
श्रीगोंदा । वीरभूमी - 17-Oct, 2020, 12:00 AM
शनिवार दि.१७ रोजी श्रीगोंदा येथील कोविड केंद्रात ४२ रॅपिड अँटीजन चाचण्या घेतल्या त्यात ३ जण पॉझिटिव्ह आले तर २० जणांचे घशातील स्राव घेऊन नगर येथे तपासणीसाठी पाठवले. एकूण बधितांची संख्या २०५२ झाली आहे.
दि.१७ रोजी १८ जण बरे होऊन घरी परतल्याने एकूण १९२४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मृतांचा आकडा ३३ वर स्थिर आहे. श्रीगोंदा शहरात शून्य रुग्ण सापडले तर ग्रामीण भागात कोळगाव-२ तर टाकळी लोणार येथे १ जण संक्रमित आढळला. अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.
शनिवारी घटस्थापना असल्याने सणासुदीमूळे बहुतेक लोकांनी चाचणीसाठी येण्याचे टाळले. टेस्ट कमी झाल्याने नवीन संक्रमित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.
Comments