पाथर्डी येथील चाचणीत आढळले 28 कोरोना बाधित
पाथर्डी । वीरभूमी - 17-Oct, 2020, 12:00 AM
पाथर्डी तालुक्यात आज शनिवार दि. 17 ऑक्टोबर रोजी रॅपिड अँटीजन व खाजगी कोरोना चाचणीमध्ये पाथर्डी शहरात 06 तर तालुक्यात 19 तर शेवगाव शहरासह तालुक्यात 3 असे एकुण 28 कोरोना बाधित आढळले.
आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये पाथर्डी शहरातील पाथर्डीसह 1, वडारवाडी 1, वामनभाऊनगर 3, इंदिरानगर 1 असे 6 कोरोना बाधित आढळले.
तर तालुक्यातील सोमठाणे 1, तिसगाव 3, त्रिभुवनवाडी 1, येळी 2, दैत्यनांदूर 1, जांभळी 1, खरवंडी कासार 2, करंजी 1, तनपुरवाडी 1, हनुमानटाकळी 2, पागोरी पिंपळगाव 1, पिंपळगाव टप्पा 1, माळेगाव 1, पाडळी 1, तर शेवगाव शहरातील 2, नागलवाडी (शेवगाव) 1 असे एकुण 28 कोरोना बाधित आढळले.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, घराबाहेर जातांना तोंडाला मास्क लावावा. व सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, तसेच लक्षणे आढळल्यास तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
CoMjNQJW