अहिल्यनगर । वीरभूमी - 20-Oct, 2024, 04:28 PM
विधानसभा निवडणुकीत सर्वप्रथम भाजपाने पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये शिर्डी, शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड या विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये शिर्डी मधून राधाकृष्ण विखे पाटील, शेवगाव मधून मोनिका राजळे, राहुरीमधून शिवाजीराव कर्डिले, श्रीगोंद्यातून प्रतिभा पाचपुते व कर्जत-जामखेडमधून राम शिंदे यांच्या नावाचा समावेश आहे.
महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. तर मंगळवार दि. 22 ऑक्टोबर 2024 पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. भाजपा, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) व मित्र पक्षांची महायुती असल्याने मतदार संघ कोणाला मिळेल? कोणाला उमेदवारी मिळणार? याबाबत चर्चा झडत होत्या. अशीच चर्चा अहिल्यानगर जिल्ह्यात सुरु होत्या.
मात्र महायुतीतील भाजपाने आज रविवारी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी, शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड या विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचा समावेश आहे.
पहिल्या यादीमध्ये शिर्डी मधून राधाकृष्ण विखे पाटील, शेवगाव मधून मोनिका राजळे, राहुरीमधून शिवाजीराव कर्डिले, श्रीगोंद्यातून प्रतिभा पाचपुते व कर्जत-जामखेडमधून राम शिंदे यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आले आहे.
2019 च्या निवडणुकीत भाजपाने अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, नेवासा, राहुरी, शेवगाव, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड या मतदारसंघातून उमेदवार दिले होते. मात्र आज जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये कोपरगाव, अकोले, नेवासा, श्रीरामपूर, संगमनेर या मतदारसंघाचा समावेश नसल्याने या जागा शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांना सोडल्या असल्याचे बोलले जात आहे.
भाजपाने पहिल्या यादीमध्ये श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातून आ. बबनराव पाचपुते यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच कर्जत-जामखेडमधून विधान परिषदेवर वर्णी लागललेले आ. राम शिंदे यांना पुन्हा विधानसभेला संधी मिळाली आहे.
मागील निवडणुकीत पराभव मिळालेले शिवाजीराव कर्डिले, राम शिंदे यांना भाजपाने पुन्हा उमेदवारी जाहीर करुन पराभवाचा वचपा काढण्याची संधी उपलब्ध करण्याची संधी दिल्याचे बोलले जात आहे.
Comments