श्रीगोंदा टॉपवर । सर्व तालुके 71 च्या आत
अहमदनगर । वीरभूमी- 04-Jul, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीमध्ये हळू हळू वाढ होऊ लागली आहे. आज रविवारी नगर जिल्ह्यात 491 कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात शनिवारी 406 कोरोना बाधित आढळले होते. याच्या तुलनेत आज 85 ने वाढ झाली आहे.
मागील काही दिवसापासून कोरोना बाधितांच्या आकडेवारीमध्ये घट होत आहे. मात्र आज शनिवारच्या तुलनेत 85 ने एकुण आकडेवारीत वाढ झाली आहे. याला कारण म्हणजे नागरिकांचा बेजबाबदारपणा कारणीभूत ठरत आहे.
आज आढळलेल्या आकडेवारीत श्रीगोंदा तालुका टॉपवर आला असून आजची आकडेवारी 71 एवढी आहे. मात्र इतर तालुक्यांची आकडेवारी 71 च्या आत असल्याने काही अंशी दिलासा मिळत आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे. नागरिकांनी नियमाचे पालन केले तर कोरोनाची आकडेवारी शुन्यावर येऊ शकेल.
आज रविवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 17, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 245 तर अँटीजेन चाचणीत 229 असे 491 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- श्रीगोंदा 71, पारनेर 58, पाथर्डी 47, नेवासा 40, शेवगाव 38, राहुरी 37, नगर ग्रामीण 32, राहाता 30, जामखेड 26, संगमनेर 24, कर्जत 23, नगर शहर 16, श्रीरामपूर 16, अकोले 13, कोपरगाव 12, इतर जिल्हा 06, भिंगार 02 असे एकुण 491 कोरोना बाधित आढळले आहेत.
Comments