श्रीगोंदा । वीरभूमी - 05-Jul, 2021, 12:00 AM
केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल-डिझेल इंधन दरवाढीचा उच्चांक केलेला असल्याने व अशातच केंद्र सरकारने घरगुती गॅस दरात प्रचंड वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेला धक्का दिला आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ सोमवार दि. 5 रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इंधन दरवाढी विरोधात आंदोलन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्षा मिनल भिंताडे यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
यावेळी अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की देशात पेट्रोल-डिझेल इंधन दरवाढीने उच्चांक गाठला आहे. महागाई व इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असताना केंद्र सरकारने गॅस दरवाढ करून गृहिणींचंही कंबरडे मोडले आहे. देशातील सामान्य जनता कोरोनाशी दोन हात करत असताना केंद्र सरकार वारंवार महागाई वाढवून सर्वसामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत करत आहे.
आज इंधन दरवाढीवर जनक्षोभ असूनही मोदी सरकार ढिम्मपणे चेष्टा करत आहे. केंद्र सरकारचं केवळ निवडणुकीवर लक्ष असून निवडणुका लागल्या की इंधन दरवाढ नियंत्रित करायची आणि निवडणुका संपल्या की आपल्या आश्वासनांचा विसर पडत सर्वसामान्य जनेतला वार्यावर सोडायचं हे षडयंत्र चालू आहे. सर्वसामान्य जनतेच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले तरी चालेल ही भूमिका मोदी सरकारची आहे असे निवेदनात म्हटले आहे.
आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण शेलार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक प्रदेश सचिव अख्तर शेख, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागचे तालुकाध्यक्ष संदिप उमाप, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय खेतमाळीस, राष्ट्रवादी काँग्रेस युवती तालुकाध्यक्ष दिपाली बोरुडे, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष अजीम जकाते, सावता परिषदेचे अध्यक्ष राजू गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागचे जिल्हा उपाध्यक्ष रुपेश काळेवाघ, कार्याध्यक्ष गोरख घोडके, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुशील शिंदे,
अतुल लोखंडे, शाम जरे, राहुल बागे, तालुका उपाध्यक्ष दिपक ससाणे, तालुका उपाध्यक्ष आकाश भोसले, भीमा शिंदे, सार्थक पंधरकर, राजू मोटे, भाऊसाहेब मेटे व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
VnEMvDoLT