बक्तरपूर येथील रेडी नदीत आंदोलन करत दिले निवेदन
बक्तरपूर । वीरभूमी - 22-Oct, 2020, 12:00 AM
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा. या मागणीसाठी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी शेवगाव तालुक्यातील बक्तरपूर जवळील रेडी नदीतील पाण्यात अर्धनग्न होवून पाण्यात उतरून आंदोलन करण्यात आले.
भारतीय घटनेतील अनुसूचित जमातीच्या यादीतील 36 व्या क्रमांकावर असलेले धनगर (इंग्रजी) हीच महाराष्ट्रातील जमात असल्याचे केंद्र व राज्य सरकारच्या अनेक दस्तऐवजातून सिद्ध झालेले आहे.
आंदोलनकर्त्यांचे भातकुडगाव मंडलाधिकारी अप्पासाहेब शिंदे, कामगार तलाठी प्रदीप मगर, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना शासनापर्यंत कळविण्यात येतील असे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात जय मल्हार सेनेचे दत्तात्रय वीर, रासपचे तालुकाध्यक्ष आत्माराम कुंडकर, अरुण कर्डिले, अशोक पाचे, तुकाराम काळे, अशोक लांडे, दशरथ मिसाळ, दत्तात्रय गाडे, आप्पासाहेब क्षिरसागर, संतोष वारे, दत्तात्रय काळे, बाबासाहेब पाचे, काशिनाथ पाचे, आत्माराम पुंडक, हरी कर्डिले, सचिन काळे, संजय वारे, शिवाजी मतकर, श्रीहरी वारे, सतीश हुलणे, जालिंदर देशमुख, अशोक कोल्हे, कडूबाळ क्षिरसागर यांच्या सह धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ulfRnGFbYBgVcK