नववर्षाचे स्वागत करा, जरा जपुन!
नववर्षाचे स्वागत करा, जरा जपुन!
लेखक ः रमेश कृष्णराव लांजेवार 28-Dec, 2021, 01:53 PM
2020 मध्ये कोरोना महामारीने भारतासह संपूर्ण जगात पाय पसरवीले. या नंतर 2021 मध्ये करोना महामारीच्या दुसर्या लाटेने उग्र रूप धारण केले. यात लाखोंच्या संख्येने मोठ्या प्रमाणात जिवीत हानी झाली. अनेकांचे संसार उद्धवस्त व अनेकांनी आपले आप्त-नातेवाईक गमावीले.कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेतुन भारतासह संपूर्ण जग सावरू लागला तोच ओमिक्रॉनने पाय पसरविण्याला सुरूवात केल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोना महामारीने अजुनपर्यंत मानवजातीचा पिच्छा सोडलेला नाही.
2021 च्या सरत्या शेवटी ओमिक्रॉनने प्रवेश केला. परंतु 2022 च्या नवीन वर्षात ओमिक्रॉन उग्र रूप धारण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भारतासह महाराष्ट्रातील नागरिकांनी 31 डिसेंबर 2021 ला निरोप देतांना व नवीन वर्षाचे स्वागत करतांना कोरोना महामारीच्या संपूर्ण नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.
नवीन वर्षाचे स्वागत करतांना गर्दी करू नये, वाढत्या दुर्घटना पहाता मद्यपिवुन गाडी चालवु नये, जास्त जल्लोष टाळला पाहिजे.ओमिक्रॉनचा धोका पहाता सर्वांनीच आपल्या घरी बसूनच नवीन वर्षाचे स्वागत करावे, मास्कचा वापर करावा. कारण पुढे चालून परिस्थिती गंभीर होणार नाही याकरिता स्वत:वर सर्वांनीच नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आता कोरोनाच्या तिसर्या स्ट्रेन्थने प्रवेश केला आहे. त्यामुळे प्रत्येकांनी सावध रहाणे गरजेचे आहे.
2020 व 2021 ने संपूर्ण जगाला दु:खाच्या सागरात लोटले. यात आतापर्यंत कोरोना महामारीने जगात 54 लाख लोकांचा बळी गेला तर भारतात 4 लाख 80 हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले.
कोरोना संक्रमणामुळे अनेक हासते-खेळते परिवार उध्दवस्त झाले व अनेकांचा रोजगार गेला. यामुळे जगावर आर्थिक संकट ओढवून आले. भारतासह संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ढासळली. संपुर्ण जग शांततेने जीवन जगत होते. परंतु कोरोनाच्या रूपाने चीनने विषाणू पसरवून मृत्यृचे तांडव निर्माण केले.
कोरोना महामारीचे वाढते मृत्यू तांडव पहाता संपूर्ण जग हादरून गेले. यावर औषध काढण्याकरिता संपूर्ण जग एकवटला. प्रत्येक देश आपल्या परीने व्हॅक्सीन किंवा औषध काढण्याकरिता चुरशीचे प्रयत्न करू लागले. तब्बल एक वर्षानंतर कोरोनावर व्हॅक्सीन निघाली. सन 2020 अमेरिकेच्या इतिहासातील मृत्यू तांडवाचे वर्षे मानल्या जात आहे. 2020 च्या कोरोना कारस्थानामुळे जगात एवढी उथल-पुथल झाली आहे की, तिसरे महायुद्धाची शक्यता वर्तवली जात होती.
2020 व 2021 यावर्षात कोरोना महामारीने एवढी बिकट समस्या उभी केली की, बेरोजगारी, कुपोषण, भुकमरी, आत्महत्या सारख्या महाभयानक परीस्थिती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसून आले. कोरोनामुळे 2020 व 2021 यावर्षात आप्त-नातेवाईक यांच्यात कटुता निर्माण झाली व कोणीही एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होवू शकले नाही.
सोशल डिस्टंसीगचा फार्मुला संपूर्ण जगात अंमलात आला. परंतु 2020 व 2021 यावर्षात लॉकडाउन काळात निसर्गाने व जंगलातील वन्यप्राणी यांनी खुला श्वास घेतला. परंतु कोरोना काळात मानवासोबतच पाळीव प्राण्यांची सुध्दा मोठ्या प्रमाणात जिवीत हानीसुध्दा झाली.
2020 व 2021 यावर्षात मानवाची व निसर्गाची दीनचर्या यात मोठ्या प्रमाणात बदलाव दिसून आला. अशा प्रकारे 2020 ने व 2021 ने जगासाठी दु:खाचा डोंगर उभा केला. कोरोना महामारीने आपल्याला बरेच काही शिकवीले. वाढते प्रदुषण पहाता सर्वांनीच मास्क लावने गरजेचे आहे, लग्नसमारंभाच्या मर्यादेचे पालन करून वाढता खर्च कमी झाला. बाहेरच्या खाण-पाणावर कंट्रोल ठेवने, लोकांच्या खानपाणात नियंत्रण आल्यामुळे अनेकांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्या. म्हणजेच करोणाने जेवढे दु:ख दिले त्यापेक्षा जास्त शिकवीले सुध्दा.
जगातील कोणतीही महामारी असो, वाढते प्रदुषण, ग्लोबल वॉर्मीग, जंगल तोड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, परमाणु परीक्षण, पृथ्वीवरील वाढता दारूगोळा इत्यादी अनेक कारणांमुळे पृथ्वीचे संतुलन डगमगत आहे. याचे प्रायचित्य जगातील संपूर्ण जीव सृष्टीसह, मानव, जीव-जंतु भोगत आहे आणि या संपूर्ण घटनेला जबाबदार आहे फक्त मानवजातीच मग ती कोणत्याही देशाची असो. म्हणेच आज मानवाने स्वत:हुन मौत का कुंआ खोदुन ठेवला आहे.
कोरोना महामारी ही मानवाचीच देन आहे. म्हणजेच आज मानवाने स्वत:च्या स्वार्थासाठी जगाचे वाटोळे केले आणि मृत्यूला कवटाळण्यासाठी आ बैल मुझे मार अशी परिस्थिती करून ठेवली आहे. त्यामुळे जगाने कोरोना महामारीपासुन काहीतरी धडा घेतला पाहिजे व निसर्गाचे संतुलन स्थीर ठेवण्यावर जोर दिला पाहिजे.
2020 व 2021 ने जगाच्या प्रत्येक देशांना अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या जखमा व घाव घातले. या जखमा भरून काढण्याची संपूर्ण मानवजात एकवटली पाहिजे व 2022 चे स्वागत केले पाहिजे.
जनतेला मी आग्रह करतो की 2022 आला म्हणून हवेत उडु नका. कारण कोरोनाचा धोका टळलेला नसुन ओमिक्रॉनच्या रूपात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे प्रत्येकांनी आपल्या लसीचे डोस पुर्ण करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. कारण ओमिक्रॉनच्या तिसरी स्ट्रेन्थने जगातील 108 देशांना घेरले आहे व जगभर पसरत आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसीग, मास्कचा वापर या गोष्टी काळजीपुर्वक करने गरजेचे आहे.
2020 व 2021 ने मंदिर-मज्जीद, गुरूव्दारा, चर्च, बौद्ध विहार इत्यादी अनेक धार्मिक देवस्थान व पर्यटन स्थळांपासुन जगातील संपूर्ण मानवजातीला दुरावले गेले. 2020 व 2021 ने संपूर्ण विश्वाचाच विश्वासघात केला आहे. परंतु आतातरी चीन असो किंवा आणखी कोणताही देश असो त्याने अतीरेक करने सोडले पाहिजे. व 2022 मध्ये विश्वामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी संपूर्ण विश्व एकवटला पाहिजे. तेव्हाच मानवजातीची मानुसकी दिसून येईल.अन्यथा मानवाची तुलना राक्षस जातींमध्ये केल्या जाईल.
चीनच्या विस्तारवादी नीतीने मानवजातीला कलंकित केले आहे आणि आताही चीन विनाषकारी व्हायरस तयार करीत आहे. चीनने महाशक्ती बनण्याच्या उद्देशाने 2020 मध्ये कोरोनाच्या रूपाने महामारी तयार केली आणि ही महामारी एवढी टोकाला जाऊन पोहोचली आहे की, प्रत्येक देशाने चीनला तिरप्या नजरेने पाहत आहे. संपूर्ण देशांनी मोठ्या प्रमाणात परमाणू बॉम्बसह अत्याधुनिक हातीयाराचा जखीडा तयार केला आहे. यामुळेच जगात तिसरे महायुद्ध केव्हाही भडकु शकते, याला नाकारता येत नाही. त्यामुळे 2022 या नवीन वर्षात प्रवेश करतांना कोरोना महामारी, ओमिक्रॉन व इतर परिस्थिती पाहता सर्वांनीच सावधगिरी बाळगली पाहिजे व नवीन वर्षाचे स्वागत साधेपणाने केले पाहिजे.
नववर्षाच्या निमित्ताने भारतासह महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने एक वृक्ष लावुन स्वागत करावे. यामुळे प्रदूषणावर मात करता येईल. महाराष्ट्रातील ओमिक्रॉनचा धोका पहाता नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्वांनीच जागरूक व सावध असले पाहिजे. नवीन वर्षाचे स्वागत सर्वांनीच अवश्य केले पाहिजे परंतु जपून! आपण सर्वांनीच शपथ घेतली पाहिजे की, नवीन वर्षात नवीन संकल्प, नवीन उमंग, नवी आशा, नवीन दिशा निर्माण व्हावी याच उद्देशाने पुढचे पाऊल टाकावे व येणार्या महामारीला रोखण्यासाठी सर्वांनीच कटीबद्ध रहाले पाहिजे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने घालून दिलेल्या संपूर्ण नियमांचे काटेकोर पालन करावे.
लेखक ः रमेश कृष्णराव लांजेवार,
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी, नागपूर), मो. 9921690779
gPIdhOAZyREixuU