अकोले । वीरभूमी - 17-Feb, 2023, 10:43 PM
महाशिवरात्रीनिमित्त श्रीक्षेत्र अगस्ति ऋषी आश्रमात शनिवारी दि. 17 रोजी पहाटे 3 वाजता महापूजेचा मान खा. सदाशिव लोखंडे व नंदाबाई लोखंडे आणि आमदार डॉ. किरण लहामटे व पुष्पा लहामटे यांना देण्यात आला आहे. श्री अगस्ति ऋषींच्या मूर्तीस ते सपत्निक पहाटे 3 वाजता पूजा करून महाभिषेक घालतील.
महाशिवरात्रीनिमित्त शनिवार व रविवार असे सलग दोन दिवस यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दुपारी 4 वाजता महाराष्ट्रातील ख्यातनाम कुस्तीगीरांचा कुस्त्यांचा थरार पहायला मिळेल, अशी माहिती श्रीक्षेत्र अगस्ति देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. के. डी. धुमाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अगस्ति देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. के. डी. धुमाळ, सचिव सुधाकर शाळीग्राम, खजिनदार किसनराव लहामगे, विश्वस्त व बाजार समिती सभापती परबत नाईकवाडी, विष्णू महाराज वाकचौरे, गुलाबराव शेवाळे, मच्छिंद्र संतू भरीतकर, भानुदास तिकांडे, दिपक महाराज देशमुख, राजेंद्र महाराज नवले, उद्योजक संभाजी भिंगारे, म्हतारबा भांगरे,
नवनाथ गायकवाड, जयप्रकाश महाले, रामकृष्ण शेणकर, मारूती भिंगारे, रमेश नवले, सुरेश वाकचौरे, बाळासाहेब फोडसे, रावसाहेब देशमुख, गोविंद वाळुंज, मधुकर वाकचौरे, संपत शेटे, किसन नाईकवाडी, बाळासाहेब घोडके, रामनिवास राठी, सतीश बुब, अनिल किसनराव गायकवाड, किसन शेटे, दिगंबर म्हसे बद्रीनारायण मुंदडा, दामू तिकांडे व व्यवस्थापक रामनाथ मुतडक व सामाजिक संघटनेकडून यात्रा शांततेत पार पाडण्याबाबत तयारी करण्यात येत आहे.
यानिमित्त दररोज पहाटे 4 ते 6 वाजता काकडा भजन, 7 ते 10.30 वाजता श्री. ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 1 ते 3 वाजता नियमाचे भजन, दुपारी 3 ते 5 वाजता कथाकर हभप. राजेंद्र महाराज नवले यांची संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र कथा, सायंकाळी 5 ते 6 वाजता हरिपाठ, रात्री 7 ते 9 वाजता हरिकिर्तन व महाप्रसाद व तद्नंतर हरिजागर असे कार्यक्रम सुरू आहेत. रविवारी 19 फेब्रुवारीस सकाळी 10 ते 12 वाजता हभप. राजेंद्र महाराज नवले यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे, असेही धुमाळ यांनी स्पष्ट केले.
Comments