संगमनेर । वीरभूमी- 05-Mar, 2021, 12:00 AM
संगमनेर तालुक्यातील पुर्व व पठार भागाला वरदान ठरलेल्या कौठे - मलकापूर येथील युटेक शुगर लि. चे श्री गजानन महाराज प्रकट दिनाचे औचित्य साधून श्री. गजानन महाराज शुगर लि. असे नामांतर करण्यात आले आहे.
श्री. गजानन महाराज प्रकटदिनाचे औचित्य साधून विधीयुक्त पद्धतीने युटेक शुगर लिमिटेडचे श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड नामांतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संस्थापक चेअरमन रविंद्र बिरोले, न्यायाधिश वाकचौरे, संचालक शंतनू बिरोले, सौ. आश्विनीताई बिरोले, अॅड. रामदास शेजूळ, सुभाष कोळसे, हरिभाऊ गीते, एकनाथ नागरे, नंदू भूजाडी, तोडमल आण्णा, अशोक वराळे, भारत कोरडे,
कोरडे सर, बुवाजी खेमनर, दिघे, अतुल नागरे, मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक बडे, अनिल वाकचौरे, गोरख डर्हाळे, तान्हाजी बागुल, वसंत चरमल, अजित गुळवे, सचिन देशमाने, भाजपा तालुका उपाध्यक्ष महेश जगताप यांच्यासह विविध गावाचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी चेअरमन रविंद्र बिरोले म्हणाले की, माळरानावर श्री. गजानन महाराज यांचे नाव घेवून येटेक शुगर लि. ची निर्मिती केली. गेल्या 7 ते 8 वर्षांत येणार्या अडचणीवर मात करत युटेक शुगर लि. ने गरुड झेप घेत शेतकर्यांसह सर्व सामान्याना न्याय देण्याचे काम केले तर साखर कारखाना सुरळीत राहीला. ही किमिया केवळ महाराजांमुळेचं. त्यामुळे श्री गजानन महाराजाचे शुगर लि. हे नामांतर केले असून 3 लाख 35 हजार टन आता पर्यंत गाळप झाले आहे.
भविष्यात गजानन महाराजांमुळे कारखान्याला महत्व निर्माण होणार आहे.
Comments