अकोले । वीरभूमी - 03-Mar, 2021, 12:00 AM
तालुक्यातील जनतेचा कोविड लसी बाबतचा संभ्रम दूर व्हावा म्हणून आज आपण अकोले ग्रामीण रुग्णलयात येऊन सपत्नीक कोविड लस घेतली असुन तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनी ही कोविड लस घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी केले.
केंद्र व राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांना कोविड लस देण्याचा निर्णय घेतल्याने अकोले ग्रामीण रुग्णालयात लसीकरण सुरु करण्यात आले आहे. आज सकाळी राज्याचे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी पत्नी राजुरच्या आदर्श सरपंच सौ. हेमलताताई पिचड यांचे समवेत अकोले ग्रामीण रुग्णालयात येऊन सिरम इन्स्टिट्यूटची कोविड लस घेतली. यावेळी परीचारक आकाश देसाई यांनी लस दिली.
याप्रसंगी माजी आमदार वैभवराव पिचड, वैैैैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब मेहेत्रे, डॉ. सुनिल साळुंके, सौ.सुरेखा करवंदे (पोपेरे) उपस्थित होते. यावेळी रुग्णालयाजवळ अकोले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे. डी. आंबरे, सचिव यशवंत आभाळे, खजिनदार एस. पी. देशमुख, गिरजाजी जाधव, सौ.कल्पनाताई सुरपुरीया, सुधाकर देशमुख, राजेंद्र डावरे, प्राचार्य भास्कर शेळके, पगारे सर, ताकटे सर व एस. पी. मालुंजकर, राहुल देशमुख, अजित सुरपुरीया, तुषार सुरपुरीया उपस्थित होते.
यावेळी पिचड म्हणाले, मी दोन महिन्यांपूर्वी आजारी असल्याने मुंबईत उपचार घेत होतो. कोरोना प्रतिबंधक लसही, मुंबईत माझ्यावर उपचार करणार्या दवाखान्यात घेता आली असती. परंतू अकोल्यात येवुन आपण लस घेतली तर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांसह जनतेचा लसीसंदर्भातील संभ्रम दूर होईल, याउद्देशाने आपण आज ग्रामीण रुग्णालयात येवून लस घेतली.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान यांनी स्वतः ही लस घेऊन देशवासीयांना आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत तालुक्यातील सर्वांनी ही कोविड लस घ्यावी व आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी आता तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद आहे. मात्र लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी असल्याने अनेकदा नेटवर्क प्रॉब्लेम व अनेक ज्येष्ठ नागरीकांकडे अँडरॉईड मोबाईल नसल्याने नोंदणी न करताच रुग्णालयात येतात. मात्र अकोले ग्रामीण रुग्णालयाला कर्मचारी कमी असल्याने लसीकरणाला अडचण अथवा उशीर होत असल्याचे निदर्शनास आणुन दिले.
तर पिचड यांनी कोविड रुग्णसंख्या बाबत विचारले असता तालुक्यात रुग्णसंख्या हळूहळू वाढत असून लवकरच खानापुर येथे कोविड सेंटर सुरु करणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
zdObukrPRVNpmMyQ