कोपरगाव । वीरभूमी - 03-Mar, 2021, 12:00 AM
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ते डाऊच खुर्द रस्त्याचे मजबुतीकरणा ला सुरुवात झाली असुन आमदार आशुतोष दादा काळे यांचे मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या माजी सभापती व विद्यमान सदस्या सौ. अनुसयाताई रोहिदास होन यांच्या सेस निधीतुन या कामासाठी २.५ लाख रूपयेचा निधी उपलब्ध करुन दिला असुन या कामाचा शुभारंभ माजी सभापती सौ. अनुसयाताई रोहिदास होन व सहकार महर्षी शंकरराव काळे कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला.
हा शिव रस्ता दोन्ही गावांना जोडणारा असून, दळण वळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. बऱ्याच दिवसापासून या रस्त्याची अवस्था खूप खराब झाली होती. त्यामुळे परिसरातील नागरिक व शेतकरी यांची गैरसोय झाली होती.. तसेच या रस्त्यावर दुतर्फा अतिक्रमण झाल्यामुळे रस्ता अतिशय अरुंद झाला आहे. त्यामुळे अतिक्रमण हटविण्यासाठी भगीरथ होन व सुभाष होन, रोहिदास होन यांनी पुढाकार घेत तहसीलदार कोपरगाव यांच्याकडे विजय सप्तपदी या योजनेतून सदरचा रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यासाठी अर्ज केला आहे, दोन्ही गावच्या शेतकऱ्यांनीही याला उस्फुर्त प्रतिसाद देत सह्या देऊन संमती दिली आहे.
या प्रसंगी मोहन गुजर, शंकरराव चव्हाण, भास्करराव होन, भगीरथ होन, राजेंद्र होन, किरण होन, नूरमोहंम्मद शेख, रावसाहेब होन, सुनील गुरसळ, बाळासाहेब खरात, मोहन गुरसळ, भास्कर गुरसळ, मोहन पवार, धर्मा गुरसळ, कर्णना गुरसळ, मन्सूर शेख, गनिभाई शेख, फारूक शेख, सुनील होन, दादासाहेब होन, विलास चव्हाण, बाळासाहेब गुरसळ, विनायक गुरसळ, शरद गुरसळ, मनोज माकोने, बाबासाहेब बोरावके, अभियंता गायकवाड, ग्रामसेवक सुकेकर, ठेकेदार किशोर गुरसळ आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक व सर्वांचे आभार सुधाकर होन यांनी मानले.
Comments