वटवृक्ष रोपण व पूजन करून वटसावित्री पौर्णिमा उत्साहात
वटवृक्ष रोपण व पूजन करून वटसावित्री पौर्णिमा उत्साहात
संगमनेर । वीरभूमी- 24-Jun, 2021, 12:00 AM
दंडकारण्य अभियानांतर्गत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी संगमनेर तालुक्यात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त अकराशे अकरा वटवृक्षाची रोपण करण्यात आले. वट, पिंपळ, उंबर यांसह सर्व देव वृक्ष हे सर्वाधिक ऑक्सिजन देणारे असल्याने या सर्व वृक्षांचे नागरिकांनी संवर्धन करावे, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.संगमनेर नगर परिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत संगमनेर शहरात विविध ठिकाणी वृक्ष वृक्षांचे रोपण व पूजन करण्यात आले. तसेच संगमनेर तालुक्यात सौ दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीत खांडगाव, कवठे कमळेश्वर, चिखली, निळवंडे येथेही वट पूजन व वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी समवेत सौ. सुनंदाताई दिघे, सौ. स्मिताताई बांगर, सौ. निर्मलाताई गुंजाळ, सौ. अर्चनाताई बालोडे, सौ. सौदामिनी कानोरे, सौ. राधाबाई गुंजाळ, सौ. मुक्ताबाई पवार, सौ. मनीषा उकिरडे, कवठे कमळेश्वरच्या सरपंच सौ. मीराताई भडांगे, सौ. सोनाली नवनाथ जोंधळे, सौ. सुनिता मुसळे, सौ. गायत्री जोंधळे, नगरसेवक गजेंद्र अभंग, प्रा. बाबा खरात, बाळासाहेब उंबरकर, विलास हासे, बाळासाहेब पवार, सौ. रुपाली औटी, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर हे हरित शहर, स्वच्छ शहर होत आहे. यामध्ये नागरिकांचाही मोठा सहभाग आहे. वटसावित्री पौर्णिमेला भारतीय परंपरेत मोठे स्थान असून यानिमित्त देव वृक्षांची आपण पूजा करतो. हे वृक्ष सर्वाधिक ऑक्सिजन देणारी आहेत.
संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील तीनशे वर्षांपूर्वीचा महाकाय वटवृक्ष हा संगमनेर तालुक्याचे वैभव आहे. याचे ऐतिहासिक महत्त्वही सुद्धा वेगळे आहे. कोरोनाच्या संकटामुळे सर्वांना प्राणवायूची मोठी उणीव भासली. या पुढील पिढ्यांसाठी आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासू नये याकरता सर्वांनी वृक्षांचे रोपण, संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
यामध्ये पिंपळ, वड, उंबर, कडूनिंब, चिंच या वृक्षांचे रोपण व संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. या वृक्षामुळे जमिनीची धूप कमी होत असून पर्यावरण संतुलनामध्ये या वृक्षांचे मोठे काम आहे. वृक्षांमुळे हिरवी गार सावली, परिसराचे वैभव, सजीवांसाठी शुद्ध ऑक्सिजन मिळणार असून ग्लोबल वार्मिंगची वाढली समस्या कमी करण्यासाठी सर्वांनी वृक्ष संवर्धन करून हिरवाई निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
प्रा. बाबा खरात म्हणाले की, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दंडकारण्य अभियान ही संगमनेर तालुक्याची राज्यात ओळखली आहे. या वर्षीही सर्वांनी दंडकारण्य अभियानात सक्रिय सहभाग घेत हिरवी वनराई अधिक समृद्ध करण्यासाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
संगमनेर शहरात नगर परिषदेच्या वतीने माझी वसुंधरा हे अभियान राबवले असून प्रत्येक वार्डात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले असून त्याची जबाबदारी स्थानिक पदाधिकार्यांवर देण्यात आली आहे.
संगमनेर शहर हे गर्द वनराईमुळे हिरवे शहर, झाडांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले असल्याचे सौ. सुनंदाच्या दिघे यांनी म्हटले आहे. यावेळी दंडकारण्याची विविध गाणे गाऊन महिलांनी वटवृक्षाची पूजा केली.
cvMXkSHypJLU