अहमदनगर । वीरभूमी- 24-Jun, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारीमध्ये घट झाल्यानंतर आज पुन्हा बुधवारच्या तुलनेत अल्पशी वाढ झाली आहे. कासवगतीने वाढणार्या कोरोना बाधितांमुळे नगरकरांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आज गुरुवारी जिल्ह्यात 484 कोरोना बाधित आढळले आहेत.
मागील काही आठवड्यापासून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारीत घट होत असतांना आज गुरुवारी जिल्ह्यातील आकडेवारीत बुधवारच्या तुलनेत 80 ने वाढ झाली आहे. आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये पारनेर टॉपवर आला आहे. मात्र कालच्या तुलनेत आज एक अनकाने घट झाल्याने दिलासा मिळत आहे.
जिल्ह्यातील इतर तालुक्याची आकडेवरीत अल्पशी वाढ झाली आहे. तर राहाता, नेवासा, पाथर्डी येथील आकडेवारीत बुधवारच्या तुलनेत घट झाली आहे. नगर शहराची आकडेवारी 10 वर गेली असून भिंगारसह मिलटरी हॉस्पिटलचा आकडा आज शुन्यावर आला आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे. नागरिकांनी नियमाचे पालन केले तर कोरोनाची आकडेवारी शुन्यावर येऊ शकेल.
आज गुरुवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 47, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 146 तर अँटीजेन चाचणीत 291 असे 484 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- पारनेर 89, श्रीगोंदा 61, शेवगाव 55, संगमनेर 39, राहुरी 36, नेवासा 27, नगर ग्रामीण 26, अकोले 23, पाथर्डी 23, कोपरगाव 20, जामखेड 17, कर्जत 17, राहाता 15, श्रीरामपूर 14, इतर जिल्हा 12, नगर शहर 10 असे कोरोना बाधित आढळले आहे.
REFMYrlgnhIXoPvx