अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध
काय सुरू, काय बंद वाचा
अहमदनगर । वीरभूमी- 26-Jun, 2021, 12:00 AM
राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोका रोखण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागून करण्यात आले आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. तर इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत उघडी ठेवता येणार आहेत, तर शनिवार व रविवार पूर्णपणे बंद असणार आहे.तर सर्व दिवशी सकाळपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमाबंदी तर सायंकाळी 5 नंतर संचारबंदी असणार आहेत. हे निर्बंध शुक्रवार दि. 25 जून पासून लागू करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली.
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा पॉझिटिव्हीटी रेट हा कमी आहे. मात्र कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोका वाढू नये म्हणुन संपूर्ण जिल्ह्यात लेवल तीनचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
या निर्बंधाप्रमाणे अत्यावश्यक सेवा दैनंदिन सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत व इतर अस्थापने व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत उघडी ठेवता येणार असून शनिवार व रविवार संपूर्णपणे बंद असणार आहे. मॉल्स, थियटर्स पूर्णपणे बंद राहतील. सार्वजनिक ठिकाणे, खुले मैदाने, सायकलिंग व मॉर्निग वॉक सररोज सकाळी 5 ते सकाळी 9 वाजपर्यंत सुरु राहतील.
हॉल, रेस्टॉरंट 50 टक्के ग्राहक क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार केवळ सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. दुपारी 4 नंतर केवळ पार्सल सुविधा व घरपोहोच सेवा सुरु राहील. शनिवार व रविवार पार्सल सुविधा व फक्त घरपोहोच सेवा सुरू राहील.
खाजगी आस्थापणा कामकाजाचे दिवशी कार्यालयीन वेळेत दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहील. शासकीय व खाजगी कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. खेळ सकाळी 5 ते 9 व सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत सुरु राहील. स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्था यांच्या बैठका, निवडणुका व वार्षिक सर्वसाधारण सभा या सभागृहाचे आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने आयोजन करता येईल.
बांधकाम हे जेथे बांधकाम आहे त्या ठिकाणी राहणार्या मजुरांकरवी सायंकाळी 4 वाजता कामाचे ठिकाण सोडणे बंधनकारक राहील. कृषी संबधिची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. जिम, सलून, ब्युटिपार्लर, स्पा व वेलनेस सेंटर ग्राहकांच्या 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवता येईल. मात्र एसी चा (वातानुकुलित यंत्रणेचा) वापर करता येणार नाही.
विवाह सोहळा व इतर सामुहिक कार्यक्रमासाठी फक्त 50 व्यक्ती परवानगी असून अंत्यविधीसाठी 20 व्यक्तींना परवानगी असणार आहे. सार्वजनिक वाहतूक म्हणजे एसटी बस पुर्ण क्षमतेने सुरु राहणार असून उभे राहुन प्रवास करण्यात बंदी असणार आहे.
आंतरजिल्हा वाहतूक नियमितपणे सुरु राहील. मात्र स्तर क्रमांक 5 असलेल्या जिल्ह्यातून प्रवास करतांना थांबणार असाल तर ई-पास आवश्यक राहील. उत्पादन घटक निर्यातीशी संबधित घटक निर्यात बंधन पुर्ण करण्याची आवश्यकता असल्यास नियमितपणे सुरु राहील.
तसेच संपूर्ण जिल्ह्यात सकाळी 7 ते 5 या वेळेत जमाबंदी असणार असून सायंकाळी 5 पासून संचारबंदी असणार आहे. तरी नागरिकांनी कोरोना संसर्गाचे नियम पाळवावेत. सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा. नियमित हात स्वच्छ धुवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केले आहे.
daRAoxQjMHSFXt