पाथर्डी पोलिस ठाण्यात प्रभारी पोलिस निरिक्षक म्हणुन रणजित ढेरे यांची नेमणूक
अहमदनगर । वीरभूमी - 20-Dec, 2020, 12:00 AM
पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी हे दीर्घकालिन रजेवर गेल्याने त्यांच्या जागेवर प्रभारी पोलिस निरिक्षक म्हणुन रणजित ढेरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. रणजित ढेरे सध्या जिल्हा नियंत्रण कक्षात नेमणुकीवर होते.
पाथर्डी पोलिस ठाण्यात हजर होणारे पोनि. रणजित ढेरे यापूर्वी नेवासा पोलिस ठाण्यात कार्यरत होते. मात्र मध्यंतरी नेवासा पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचारी व तत्कालिन अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यातील संभाषण झालेल्या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे ढेरे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती.
दरम्यान, पोलीस निरीक्षक रत्नपारखी हे निवृत्त होण्यासाठी अवघ्या तीन महिन्यांचा कालावधी राहिला असतांना त्यांनी दीर्घ रजा टाकली आहे. यामुळे जिल्हा नियंत्रण कक्षातून पोनि. रणजित ढेरे यांची पाथर्डी ठाण्यात प्रभारी पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
JIOEUeGvCpNR