पाथर्डी तालुक्यातील चाचणीत आढळले 35 कोरोना बाधित
पाथर्डी । वीरभूमी - 19-Oct, 2020, 12:00 AM
सोमवार, दि. 19 ऑक्टोबर 2020 रोजी करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजन व शासकीय, खाजगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचणी अहवालातून 35 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. महेंद्र बांगर यांनी दिली.
आजा तालुक्यातील 11 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आज आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये शहरातील पाथर्डी 1, खंडोबानगर 1, नाथनगर 3 असे 5 तर तालुक्यातील देवी धामणगाव 2, जांभळी 4, कासार पिंपळगाव 1, चिचोंडी 1, अकोला 1, येळी 3, चितळी 2, पाडळी 4, जवखेडे 1, पागोरी पिंपळगाव 2, तिसगाव 5, मढी 1, कोल्हार 1, आल्हनवाडी 1, जिरेवाडी 1 असे एकुण 35 कोरोना बाधित आढळून आले.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, घराबाहेर जातांना तोंडाला मास्क लावावा. व सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, तसेच लक्षणे आढळल्यास तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
Comments