जिल्हाधिकारी म्हणुन राजेंद्र भोसले तर झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन आर. एस. क्षीरसागर
अहमदनगर । वीरभूमी - 19-Oct, 2020, 12:00 AM
पोलिस अधिक्षक, अप्पर पोलिस अधिक्षक यांच्या बदलीनंतर आता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची बदली झाली आहे. आता नव्याने जिल्हाधिकारी म्हणुन पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले तर रिक्त असलेल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन कोकण विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त आर. एस. क्षीरसागर यांची नियुक्ती झाली आहे.
गत महिन्यात पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या बदल्या झाल्या होत्या. तर ऑगस्ट मध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांची बदली झाली होती. त्यानंतर आता जिल्हाधिकारी यांची बदली झाली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर पुण्याचे अतिरिक्त विभागिय आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. राजेंद्र भोसले यांनी या अगोदर 2014 साली नगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणुन काम पाहिले आहे. यामुळे जिल्ह्याला त्यांची ओळख नवी नसणार आहे.
तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्या बदलीनंतर रिक्त असलेल्या जागेवर जागेवर कोकण विभागाचे अतिरिक्त आयुक्त आर. एस. क्षीरसागर यांची नियुक्ती झाली आहे.
Comments