दौंड - मनमाड रेल्वे वाहतूक विस्कळीत । कोणतीही जीवितहानी नाही
अहमदनगर । वीरभूमी - 23-Dec, 2020, 12:00 AM
मनमाड-दौंड रेल्वेमार्गावरील श्रीगोंदा रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी पहाटे मालगाडीचे 12 डबे घसरले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र, यामुळे रेल्वेरुळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच या मार्गावरून धावणार्या पाच गाड्या पुणेमार्गाने वळवण्यात आल्याची माहिती आहे. या दुर्घटनेमुळे वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दौंडकडून मनमाडकडे 42 डबे असलेली मालगाडी जात होती. यामध्ये सिमेंट होते. दरम्यान नगर जिल्ह्यातून जात असताना श्रीगोंदा ते बेलवंडी स्टेशनच्या दरम्यान गाडीचे 12 डबे घसरले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. या अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक सेवा झाली आहे.
दौंड-मनमाड सेक्शन मध्ये मालगाडी रुळावरून घसरल्यामुळे खालील गाड्या डायवर्ट केल्या आहेत. दरम्यान वेळापत्रकानुसार धावत असलेल्या गाड्या दुसर्या मार्गाने डायव्हर्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांना पुढे जाण्यास थोडा उशीर लागणार आहे. अपघात झाला तेव्हा या मार्गावरून धावत असलेल्या गाड्या जवळच्या स्थानकांवर थांबवण्यात आलेल्या होत्या. यामुळे मोठी दुर्घटना टळली.
मात्र या मालगाडीच्या अपघाताने इतर रेल्वे गाड्या या पुणे मार्गे वळविण्यात आल्या आहेत.
मार्ग बदलल्याने आता या रेल्वे काही तासाने उशिरा धावणार असल्याचे समजते. मालगाडीचा अपघात झाल्यानंतर मोठा आवाज झाला. या आवाजाने परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. सुदैवाने रेल्वे मालवाहतूक असल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र रेल्वे डबे व रेल्वे रुळ यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
qQYruewBaG