श्रीगोंदा तालुक्यात आज आढळले ७ कोरोना बाधित
श्रीगोंदा । वीरभूमी - 21-Dec, 2020, 12:00 AM
रविवार दि.२० रोजी तालुक्यात एकही रुग्ण संक्रमित आढळला नाही. मात्र सोमवार दि.२१ रोजी नव्याने ७ जण संक्रमित आढळले.
घेतलेल्या २८ रॅपिड अँटीजन चाचण्यात ६ जण पॉझिटिव्ह आले तर नगर येथून आलेल्या अहवालात १ जण पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. ३३ जणांचे घशातील स्राव घेऊन नगर येथे तपासणीसाठी पाठवले.
आत्तापर्यंत एकूण कोरोना बधितांची संख्या २५४६ झाली आहे. सोमवारी १२ जण बरे होऊन घरी परतल्याने एकूण कोरोनामुक्तांची संख्या २४४८ झाली आहे. आत्तापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला कोविड केंद्रात २ रुग्ण उपचार घेत आहेत तर खाजगी हॉस्पिटलमध्ये २० जण उपचार घेत आहेत.
दि.२१ रोजी श्रीगोंदा शहरात शून्य (०) रुग्ण सापडले तर ग्रामीण भागात येळपणे -३, चांडगाव-२, घोगरगाव-१ व बनपिंप्री येथे १ रुग्ण संक्रमित आढळला अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.
IeTJNsmMtlpO