शेतकर्यांचा सवाल । कोथंबीरच्या उभ्या पिकात घातला रोटर
अहमदनगर । वीरभूमी - 29-Nov, 2020, 12:00 AM
काही दिवसापूर्वी डोक्यावर पैशाचे गाठोडे घेवून जाणार्या शेतकर्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता. या घटनेची आठवण करून देत एका शेतकर्याने ‘.. आमची थट्टा करणार्यांनो आमचे हे वास्तव कधी दाखवणार? असा नेटकर्यांना सवाल करत कोथंबीर पिकाला अत्यंत कमी भाव मिळत असल्याने यातून खर्चही निघत नसल्याचे सांगत’ कोथंबीरच्या शेतात ट्रॅक्टरच्या साह्याने जमिनदोस्त करातांनाचा फोटो ट्विट केला आहे.
मागील काही दिवसापूर्वी कांद्या विक्री केल्यानंतर डोक्यावर पैशाचे गाठोडे घेवून जाणार्या शेतकर्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता. त्या फोटो खाली कांदा पिकातून शेतकर्याला लाखोचे उत्पादन मिळल्याचे सांगितले जात होते. यामुळे काही शेतकर्यांचे कौतूक झाले म्हणुन समाधानी होते तर काही विनाकारण शेतकर्याची बदनामी केली म्हणुन नाराजी व्यक्त केली जात होती.
त्यातच आज रविवारी एका शेतकर्याने कोथंबीर पिकाला भाव मिळत नसल्याने कोथंबीरच्या उभ्या पिकात ट्रॅक्टरच्या साह्याने रोटाव्हेटर घालून चांगले बहरलेले पिक जमिनदोस्त केल्याचा फोटो टाकला आहे. या फोटोखाली शेतकर्याने म्हटले आहे की, पैशाचे गाठोडे डोक्यावर घेऊन फिरताना दाखवून आमची थट्टा करणार्यांनो आमचे हे वास्तव कधी दाखवणार, कोथंबीर पिकाला अत्यंत कमी भाव असल्याने खर्चही निघत नसल्यानं आख्या शेतात फिरवला रोटर’ अशी पोस्ट केली आहे.
EiOoZUPcGuezYTJ