पाथर्डी, शेवगाव । वीरभूमी - 28-Nov, 2020, 12:00 AM
आज शनिवार दि. 28 नोव्हेंबर रोजी पाथर्डी तालुक्यात करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन, खाजगी व शासकीय कोरोना तपासणीत पाथर्डी शहरातील 8 तर तालुक्याच्या ग्रामीण भागात 15 असे एकुण 23 कोरोना बाधित आढळले. तर शेवगाव तालुक्यात करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन, खाजगी प्रयोगशाळा व जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत 9 कोरोना बाधित आढळले.
शनिवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये पाथर्डी शहरातील 1, मेनरोड 1, भगवाननगर 1, कसबा पेठ 1, फुलेनगर 3, आनंदनगर 1 असे शहरात 8 कोरोना बाधित आढळले.
तर तालुक्यातील येळी 3, दुलेचांदगाव 1, फुंदे टाकळी 1, अकोला 1, मोहोज 1, तिसगाव 4, कासारवाडी 1, वाळुंज 1, करंजी 2 असे तालुक्यात एकुण 23 कोरोना बाधित आढळले.
जिल्हा आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार शेवगाव तालुक्यातील रॅपिड अँटीजेन चाचणीत 7, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणीत 1 तर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत 1 असे एकुण 9 कोरोना बाधित आढळले.
तर आज पाथर्डी तालुक्यातील 31 तर शेवगाव तालुक्यातील 18 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, बाहेर जातांना तोंडाला मास्क लावावा, हात नियमित स्वच्छ धुवावे व सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करून कोरोना पासून बचाव करावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
JfdsnpBijIW