श्रीगोंदा तालुक्यात आज आढळले ९ कोरोना बाधित
श्रीगोंदा । वीरभूमी - 28-Nov, 2020, 12:00 AM
श्रीगोंदा तालुक्यात शनिवार दि.२९ रोजी ९ जण संक्रमित आढळले.घेतलेल्या २८ रॅपिड अँटीजन चाचण्यांत ५ जण पॉझिटिव्ह आले तर श्रीगोंदा तालुक्यातील काही रुग्णांनी शिरूर येथे केलेल्या चाचणीत ४ जण संक्रमित आढळले.
एकूण बधितांची संख्या २४०१ झाली आहे. शनिवारी ३ जण बरे होऊन घरी परतले. सद्यस्थितीला २० जण कोविड केंद्रात उपचार घेत आहेत तर खाजगी हॉस्पिटलमध्ये १४ जण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी श्रीगोंदा शहरात लक्ष्मीनगर येथे १ जण व पेडगाव रोडवर १ जण पॉझिटिव्ह आला तर ग्रामीण भागात कौठा येथे ३ रुग्ण व देवदैठण येथे ४ जण पॉझिटिव्ह आले अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.
QtAbPxYBKDHEpGV