शुक्रवारी पाथर्डी तालुक्यात 17 तर शेवगाव तालुक्यात 11 कोरोना बाधित आढळले
पाथर्डी, शेवगाव । वीरभूमी - 20-Nov, 2020, 12:00 AM
आज शुक्रवार दि. 20 रोजी पाथर्डी तालुक्यात करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन, खाजगी व शासकीय कोरोना तपासणीत पाथर्डी शहरातील 7, तालुक्याच्या ग्रामीण भागात 9 तर शेवगाव तालुक्यातील आखतवाडे येथील 1 असे एकुण 17 कोरोना बाधित आढळले. तर शेवगाव तालुक्यात करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन चाचणीत 11 कोरोना बाधित आढळले.
आज शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील पाथर्डी 2, जिरेसाळ गल्ली 1, साईनाथनगर 3, नवीपेठ 1 असे 7 कोरोना बाधित आढळले.
तर तालुक्यातील शिरापूर 1, मालेवाडी 2, कोनोशी 1, मिडसांगवी 2, काटेवाडी 1, तिनखडी 1, डांगेवाडी 1 येथील 9 तर शेवगाव तालुक्यातील आखतवाडे येथील 1 असे एकुण 17 कोरोना बाधित आढळले.
जिल्हा आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार शेवगाव तालुक्यातील रॅपिड अँटीजेन चाचणीत 10 तर खाजगी प्रयोगशाळेतील तपासणीत 1 असे एकुण 11 कोरोना बाधित आढळले.
तर आज पाथर्डी तालुक्यातील 22 तर शेवगाव तालुक्यातील 6 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, बाहेर जातांना तोंडाला मास्क लावावा, हात नियमित स्वच्छ धुवावे व सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करून कोरोना पासून बचाव करावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
SjHiCqga