निवडणुकांसाठी 10 डिसेंबर 2020 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार
अहमदनगर । वीरभूमी - 21-Nov, 2020, 12:00 AM
माहे एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या व नव्याने स्थापित अशा सुमारे 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा उडण्यास डिसेंबर पासून प्रारंभ होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने माहे एप्रिल 2020 ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणार्या व नव्याने स्थापित झालेल्या 1566 व माहे जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित सुमारे 12667 अशा एकुण 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि. 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी वापरण्यात येणार आहे.
आता नव्याने राज्यातील 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यानुसार मंगळवार दि. 1 डिसेंबर 2020 रोजी प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे. मंगळवार दि. 1 ते सोमवार दि. 7 डिसेंबर 2020 पर्यंत प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती व सुचना दाखल करणे. तर गुरुवार दि. 10 डिसेंबर 2020 रोजी प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिद्ध करतांना शुक्रवार दि. 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध झालेली विधानसभा निवडणुकीत मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
Comments