पाथर्डी तालुक्यात गारांचा पाऊस; शेतीपिकांचे नुकसान
पाथर्डी । वीरभूमी- 20-Mar, 2021, 12:00 AM
पाथर्डी तालुक्याच्या काही भागात आज शनिवारी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान झालेल्या गारपिटीने उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अचानक आलेल्या वादळी पावसाने शेतकर्यांची एकच धांदल उडाली. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकर्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
पाथर्डी तालुक्यातील काही भागात आज शनिवारी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली. पावसाच्या सुरुवातीला गारा पडल्याने शेती पिकांचे नुकसान झाले. पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव, पागोरी पिंपळगाव, सुसरे, साकेगाव, चितळी, पाडळी, ढवळेवाडी, कासार पिंपळगाव, हनुमान टाकळी आदी भागात जोरदार वार्यासह गारांचा पाऊस झाला.
गारांच्या पावसाने शेतातील गहू, हरभरा, कांदा, ज्वारी, ऊस, मका आदी पिकांसह चारा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच गारांमुळे आंबा, चिकू यांचे नुकसान झाले तर डाळिंबाचा बहार धरलेल्या शेतकर्यांनाही चांगलाच फटका बसला आहे. काही भागात 15 ते 20 मिनिटे पाऊस झाल्याने रस्त्यावर पाणी वाहत होते. गारांच्या मार्यामुळे झाडांची पानगळही झाली.
हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेती पिकांबरोबरच वीट भट्टी चालकांचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. ऊस तोडणी कामगारांनाही मोठा फटका बसला. अचानक आलेल्या पावसाने ऊस ोडणी कामगारांचा झोपडीतील संसार ओलाचिंब झाला होता.
पाथर्डी तालुक्यात झालेल्या गारांच्या पावसाने नुकसानची पहाणी करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
Comments