अहमदनगर । वीरभूमी - 16-Apr, 2021, 12:00 AM
जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून आज दुसर्या दिवशी कोरोना बाधितांची संख्या 3056 ने वाढली आहे. काल गुरुवारी 1885 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
दिवसेंदिवस वाढत्या कोरोना बाधितांमुळे चिंता व्यक्त केली जात असून नगरकरांची बेफिकीरी चिंताजनक दिशेने चालली आहे.
आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगर शहराचा आकडा 730 वर गेला असून राहाता 285, नगर ग्रामीण 273, कर्जत 199, श्रीरामपूर 178, संगमनेर 168, कोपरगाव 166, नेवासा 155, शेवगाव 149, पाथर्डी 144, राहुरी 140, पारनेर 128, अकोले 115, कॅन्टोन्मेंट बोर्ड 91, श्रीगोंदा 61, जामखेड 46, इतर जिल्हा 28 असे रुग्ण आढळले आहेत.
आज शुक्रवारी जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या रुग्ण संख्येत 3056 ने भर पडली आहे. तर काल गुरुवारी जिल्ह्यातील 1885 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
आज शुक्रवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 835, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 525 आणि अँटीजेन चाचणीत 1696 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 223, राहाता 58, नगर ग्रामीण 24, कर्जत 47, श्रीरामपूर 76, संगमनेर 71, कोपरगाव 16, नेवासा 58, शेवगाव 54, पाथर्डी 32, राहुरी 28, पारनेर 55, कॅन्टोन्मेंट बोर्ड 29, श्रीगोंदा 24, जामखेड 36, इतर जिल्हा 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 215, राहाता 104, नगर ग्रामीण 27, कर्जत 05, श्रीरामपूर 12, संगमनेर 55, कोपरगाव 06, नेवासा 04, शेवगाव 05, पाथर्डी 25, राहुरी 16, पारनेर 11, अकोले 09, कॅन्टोन्मेंट बोर्ड 15, श्रीगोंदा 03, जामखेड 03, इतर जिल्हा 10 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 1696 जण बाधित आढळून आले. मनपा 292, राहाता 123, नगर ग्रामीण 222, कर्जत 147, श्रीरामपूर 90, संगमनेर 42, कोपरगाव 144, नेवासा 93, शेवगाव 90, पाथर्डी 87, राहुरी 96, पारनेर 62, अकोले 106, कॅन्टोन्मेंट बोर्ड 47, श्रीगोंदा 34, जामखेड 07, इतर जिल्हा 14 अशा रुग्णांचा समावेश आहे.
तर काल गुरुवारी 1885 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 397, अकोले 140, जामखेड 37, कर्जत 208, कोपरगाव 78, नगर ग्रामीण 152, नेवासा 47, पारनेर 53, पाथर्डी 82, राहाता 71, राहुरी 112, संगमनेर 224, शेवगाव 87, श्रीगोंदा 18, श्रीरामपूर 71, कॅन्टोन्मेंट 56, मिलिटरी हॉस्पिटल 06, इतर जिल्हा 44 आणि इतर राज्य 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
lSDdManoLXrpeb