पाथर्डी तालुक्यात बुधवारी आढळले 21 कोरोना बाधित
पाथर्डी । वीरभूमी - 28-Oct, 2020, 12:00 AM
पाथर्डी शहरासह तालुक्यात बुधवार दि. 28 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन, खाजगी व शासकीय कोरोना तपासणीत पाथर्डी शहरातील 3 व तालुक्यातील 18 असे एकुण 21 कोरोना बाधित आढळले.
आज बुधवारी आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये पाथर्डी शहरातील रावळ गल्ली 1, क्रांतीचौक 1, वामनभाऊनगर 1 असे 3 कोरोना बाधित आढळले.
तर तालुक्यातील मोहटे 1, मुंगसवाडे 1, जिरेवाडी 1, तिनखडी 1, तिसगाव 4, दगडवाडी 1, मिडसांगवी 5, निवडुंगे 1, टाकळी मानूर 2, पिंपळगाव टप्पा 1 असे एकुण 21 कोरोना बाधित आढळले.
नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, बाहेर जातांना तोंडाला मास्क लावावा, हात नियमित स्वच्छ धुवावे व सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करून कोरोना पासून बचाव करावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
Comments