अहमदनगर । वीरभूमी- 12-Jan, 2022, 06:08 PM
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. आज बुधवारी अहमदनगर जिल्ह्यात तब्बल एकुण 448 कोरोना बाधित आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर आज 93 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 2040 एवढी झाली आहे.
मागील आठवड्यापासून कोरोना बाधितांचा आकडा वाढताच असून गेल्या आठ दिवसात तब्बल 2038 कोरोना बाधित आढळले आहेत. यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आज बुधवारपर्यंत 2040 एवढी झाली आहे. अॅक्टीव रुग्णांची संख्या दोन हजार पार गेल्याने चिंता वाढली आहे.
आज आढळलेल्या बाधितांमध्ये अहमदनगर शहराचा आकडा 144 वर पोहोचला आहे. तर दुसर्या स्थानावर राहाता, तिसर्या स्थानावर नगर ग्रामीण तर पाथर्डी तालुका चौथ्या स्थानावर आला आहे.
आज बुधवारी 93 कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांचा आकडा तब्बल 3 लाख 52 हजार 56 वर पोहोचला आहे.
आज बुधवारी अहमदनगर जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमधील तपासणीत 125, खाजगी प्रयोगशाळा तपासणीत 253 तर रॅपिड अँन्टिजेन चाचणी अहवालात 70 असे एकुण 448 कोरोना बाधित आढळले आहेत.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- नगर शहर 144, राहाता 52, नगर ग्रामीण 35, पाथर्डी 28, अकोले 26, इतर जिल्हा 22, श्रीरामपूर 20, इतर राज्य, कोपरगाव 15, राहुरी 15, भिंगार 14, पारनेर 13, श्रीगोंदा 10, संगमनेर 9, नेवासा 8, शेवगाव 8, शेवगाव 8, मिलटरी हॉस्पिटल 7, कर्जत 5, जामखेड 1 असे कोरोना बाधित आढळून आले.
वाढत्या कोरोना बाधितांमुळे चिंता वाढली असली तरी नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे व कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
uemtsRMOKX