पाथर्डी तालुक्यात गुरुवारी आढळले 35 कोरोना बाधित
पाथर्डी । वीरभूमी - 29-Oct, 2020, 12:00 AM
पाथर्डी शहरासह तालुक्यात गुरुवार दि. 29 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन, खाजगी व शासकीय कोरोना तपासणीत पाथर्डी शहरातील 15 व तालुक्यातील 20 असे एकुण 35 कोरोना बाधित आढळले.
आज गुरुवारी आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये पाथर्डी शहरातील 2, वामनभाऊ नगर 1, भगवाननगर 2, भंडार गल्ली 1, नाथनगर 5, अक्षरबाग 3, बँक कॉलनी 1 असे 15 कोरोना बाधित आढळले.
तर तालुक्यातील सुसरे 1, कासार पिंपळगाव 3, जांभळी 2, लोहसर 1, पिंपळगाव टप्पा 1, शिरापूर 1, तिनखडी 2, खरवंडी कासार 1, मिरी 2, तिसगाव 3, पालवेवाडी 1, माळी बाभूळगाव 1, जिरेवाडी 1 असे एकुण 35 कोरोना बाधित रुग्ण आढळले.
नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, बाहेर जातांना तोंडाला मास्क लावावा, हात नियमित स्वच्छ धुवावे व सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करून कोरोना पासून बचाव करावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
bEKxLWnur