अहमदनगर । वीरभूमी- 27-Feb, 2021, 12:00 AM
अहमदनगर: जिल्ह्यात आज १५७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७३ हजार ४३९ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २७८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११३३ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १४१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १२६ आणि अँटीजेन चाचणीत ११ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५०, अकोले ०६, कर्जत ०४, कोपरगाव ११, नगर ग्रामीण ०७, पारनेर ०१, पाथर्डी ०३, राहाता १५, संगमनेर १६, शेवगाव १७, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर ०२, कॅन्टोन्मेंट बोर्ड ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३९, अकोले ०५, जामखेड ०१, कर्जत ०२, कोपरगाव ०६, नगर ग्रामीण ११, नेवासा ०४, पारनेर ०१, पाथर्डी ०२, राहाता १२, राहुरी १०, संगमनेर २६, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०२ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ११ जण बाधित आढळुन आले. मनपा ०५, जामखेड ०१, नेवासा ०१, पारनेर ०१, पाथर्डी ०२, शेवगाव ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा ४९, जामखेड ०१, कर्जत ०२, कोपरगाव ०९, नगर ग्रामीण २३, नेवासा ०२, पारनेर ०८, राहाता १६, राहुरी ०३, संगमनेर ३४, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०१,, श्रीरामपूर ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या:७३४३९*
*उपचार सुरू असलेले रूग्ण: ११३३*
*मृत्यू:११४३*
*एकूण रूग्ण संख्या:७५७१५*
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
PmbfMRYWCuBDEc