राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर
मुंबई । वीरभूमी - 12-Feb, 2023, 11:58 AM
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर त्यांच्या जागेवर रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बैस हे महाराष्ट्राचे 20 वे राज्यापाल आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. या बाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बैस हे महाराष्ट्राचे 20 वे राज्यापाल आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. अखेर आज कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आज एकूण 13 नवीन राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आली आहे.
राज्यपाल पदी नियुक्ती झालेले रमेश बैस यांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 मध्ये छत्तीसगढच्या रायपूर मध्ये झाला आहे. 1978 मध्ये ते सर्वप्रथम नगरपालिकेत निवडून आले होते. 1980 ते 84 मध्ये मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य होते.
रमेश बैस यापूर्वी झारखंड आणि त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते. छत्तीसगढ राज्यातील रायपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळा ते खासदार होते. रमेश बैस यांनी केंद्रातही मंत्रीपद त्यांना होते.
Comments