15 जणांनी नेले 24 उमेदवारी अर्ज
पाथर्डी । वीरभूमी - 08-Jan, 2021, 12:00 AM
तालुक्याची कामधेनू असलेल्या श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी उमेदवार दाखल करण्याचा पहिला दिवस निरंक राहील्यानंतर दुसरा दिवसही निरंक राहीला आहे. तर आज शुक्रवारी 15 इच्छुकांनी 24 अर्ज नेले आहेत.
पाथर्डी तालुक्याची कामधेनू म्हणुन वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे पाहिले जाते. कोरोना संसर्गामुळे सुरु असलेल्या टप्प्यावर निवडणूक स्थगित करण्यात आली होती. मात्र सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे.
वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 19 जागेसाठी होणार्या निवडणुकीसाठी गुरुवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. पहिला दिवस निरंक राहील्यानंतर दुसरा दिवसही निरंक राहीला आहे. मात्र 15 जणांनी 24 उमेदवारी अर्ज नेले आहेत.
उमेदवारी अर्ज घेऊन जाणार्या उमेदवारांमध्ये सुरेश पंढरीनाथ बाबर (1), बाळासाहेब साहेबराव खेडकर (2), शंकर नामदेव भिसे (2), बाजीराव आश्राजी गर्जे (1), कालिदास उमाजी दहिफळे (2), देवराव रामभाऊ भोईटे (1), तात्यासाहेब मुक्ताजी भगत (1), संदीप म्हातारदेव राजळे (2), बाळासाहेब कारभारी कचरे (2), विनायक सूर्यभान कचरे (2), वच्छलाबाई कारभारी कचरे (2), धोंडीराम माधव गर्जे (2), विष्णू कस्तुरबा भोरडे (1), लक्ष्मीबाई विष्णूदास भोरडे (1), आनंदा विठोबा पवार (2) यांचा समावेश आहे.
KnRXHAFxJGSWvhq