वृद्धेश्वर कारखान्यासाठी 7 अर्ज दाखल; 80 अर्जाची विक्री
पाथर्डी । वीरभूमी- 11-Jan, 2021, 12:00 AM
पाथर्डी तालुक्याची कामधेनू असलेल्या श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सोमवारी 7 अर्ज दाखल झाले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखलचा पहिला आणि दुसरा दिवस निरंक गेल्यानंतर आज तिसर्या दिवशी (सोमवारी) 6 उमेदवारांनी 7 अर्ज दाखल केले आहेत. तर आज एकाच दिवशी तब्बल 80 अर्जाची विक्री झाली आहे.
पाथर्डी तालुक्याची कामधेनू म्हणुन वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे पाहिले जाते. कोरोना संसर्गामुळे सुरु असलेल्या टप्प्यावर निवडणूक स्थगित करण्यात आली होती. मात्र सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे.
वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 19 जागेसाठी होणार्या निवडणुकीसाठी गुरुवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. पहिला, दुसरा दिवस निरंक राहील्यानंतर आज तिसर्या दिवशी 6 जणांनी 7 अर्ज दाखल केले आहेत. तर आज तब्बल 80 अर्जाची विक्री झाली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करणार्या उमेदवारांची गटनिहाय नावे-अर्ज पुढील प्रमाणे- (कासार पिंपळगाव गट - 2 अर्ज)- आप्पासाहेब दादाबा राजळे, उद्धवराव रघुनाथ वाघ. (टाकळीमानूर गट- 2 अर्ज)- गोरक्ष कारभारी फुंदे, बाबासाहेब आश्रुबा गर्जे.(कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद सहकारी संस्था व बिगर उत्पादक संस्था- 1 अर्ज)- आप्पासाहेब दादाबा राजळे. (इतर मागास प्रवर्ग 1 अर्ज)- अॅड. विष्णू कस्तुरबा भोरडे. (भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी- 1 अर्ज)- भाऊसाहेब मळू उघडे. असे 6 जणांनी 7 अर्ज दाखल केले आहेत.
yiRxfMTqB