पक्ष बदलाच्या चर्चांना राजेंद्र नागवडे यांचेकडून पूर्णविराम
श्रीगोंदा । वीरभूमी - 27-Dec, 2022, 09:22 AM
मी कधीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो नाही. यामुळे शिंदे गटात जाण्याचा संबध येत नाही. तसेच मी भाजपातही जाणार नाही. मी काँग्रेसमध्येच असा ठाम निर्णय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी दै. वीरभूमीशी बोलतांना व्यक्त केला.
यामुळे राजेंद्र नागवडे इतर पक्षात प्रवेश करतील या उलटसुलट चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे आपली भूमिका मांडतांना म्हणाले, मागील दोन दशकापेक्षा जास्त काळापासून श्रीगोंद्याच्या समाजकारण व राजकारणात सक्रीय आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत आमच्या कार्यकर्त्यांनी चांगले यश मिळवत ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकविला आहे.
मी कधीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो नाही. तसेच भाजपात जाण्याचा कोणताही विचार नाही. यामुळे शिंदे गट अथवा भाजपात जाण्याचा प्रश्नच येत नाही. विनाकारणच माझ्या पक्ष बदलाच्या चर्चा घडविल्या जातात.
या पक्ष बदलाच्या चर्चा निरर्थक असून यामध्ये कोणतेही तथ्य नाही, मी काँग्रेसमध्येच असल्याचे सांगत राजेंद्र नागवडे यांनी पक्ष बदलाच्या उलटसुलट चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.
mpwWtuSjae