बोधेगाव । वीरभूमी- 21-Mar, 2021, 12:00 AM
शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त ऊस उत्पादकांना केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्यावतीने चार हजार रुपयाची आर्थिक मदत देण्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन अॅड. प्रताप ढाकणे यांनी केली.
रविवारी अॅड. ढाकणे यांनी शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव, शेकटे, नागलवाडी, गोळेगाव या नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली. यावेळी शेतकर्यांना धीर देत अॅड. ढाकणे बोलत होते.
शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव तसेच बोधेगाव जिल्हा परिषद गटात शनिवार दि. 20 रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारांच्या मार्याने कांदा, गहु, ऊस, बाजरी, पपईसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. शेतकर्यांचे आश्रू पुसण्यासाठी नुकसानीच्या दुसर्या दिवशी केदारेश्वर सहकारी साखर कारण्याचे चेअरमन अॅड. प्रताप ढाकणे यांनी नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली.
यावेळी शेतकरी विमल महादेव वैद्य, बबन तहकीक, संजय आंधळे, कालिदास आंधळे, पंढरीनाथ ढाकणे यांच्या गहु, बाजरी, पपई, कांदा, ऊस आदी पिकांची पहाणी केली. यादरम्यान केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. प्रताप ढाकणे यांनी नुकसानग्रस्त कारखाना कार्यक्षेत्रातील कुटुंबातील एका सभासदाला चार हजाराची मदत तर वार्यामुळे भुईसपाट झालेल्या उसाला तात्काळ तोड देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
कारखाना सभासद सोडून नुकसानग्रस्त शेतकर्यांना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना समक्ष भेटून मदत मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन अॅड. प्रताप ढाकणे यांनी सांगितले.
यावेळी व्हा. चेअरमन डॉ. प्रकाश घनवट, तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, कृषी सहाय्यक गजानन चव्हाण, सुभाष बारगजे, केदारेश्वरचे सचिव राजेंद्र दराडे, अंबादास दहिफळे, गोळेगावचे सरपंच संजय आंधळे, कालिदास आंधळे, लाडजळगावचे सरपंच काकासाहेब तहकीक, उपसरपंच दत्ता तहकीक, भाऊसाहेब क्षीरसागर, तात्यासाहेब मार्कंडे, नामदेव सानप, भुंजग फुंदे आदी शेतकरी उपस्थित होते.
OHWiaRnIctGA