मुंबई । वीरभूमी - 21-Feb, 2021, 12:00 AM
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली आहे.
कोरोनाला दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करावे. लाॅकडाऊन करायचे का नाही याचा निर्णय मी तुमच्यावर सोपवतोय, तो निर्णय पुढील आठवड्यात घ्यायचाय की नाही हे पाहु. मास्क लावा, कोरोना टाळा यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करावे.
कोरोनाची परिस्थिती अजून गंभीर होत असून, राज्यात दुसरी लाट आली की नाही हे लवकरच समजणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
आता मी जबाबदार अशी नवी मोहीम राबवायची आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी नंतर आता मी जबाबदार अशी नवी मोहीम. आता ऑफिसच्या वेळेची पद्धत बदलावी लागेल. वर्क फ्रॉम होम केलं तर गर्दी टळेल. त्याच्याही वेळा टाळा असे मुख्यमंत्री म्हणाले.
सर्व सामाजिक, धार्मिक, आंदोलनं, यात्रा यावर पूर्णपणे बंदी. उद्यापासून मिरवणूक, आंदोलने, यात्रांवर बंदी, पक्ष वाढवू, पण कोरोना नाही. पक्ष वाढवायचा आहे जरुर वाढवा, पण कोरोना नका वाढवू. शासकिय काम झूम मिटींगवर करण्याचे आदेश, तर आपल्याला लॉकडाऊन करावा लागेल असे मुखयमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
पुन्हा एकदा बंधनं पाळायला लागणार आहेत. अचानक लॉकडाऊन करणं घातक. उद्या रात्रीपासून जिथं जिथं वाटतं तिथं बंधनं घाला, मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश.
अचानक लॉकडाऊन घोषीत करु नका. जनतेला चोवीस तासाचा वेळ द्या असे सांगितले.
सध्या राज्यात 53 हजार सक्रिय रुग्ण, अमरावती जिल्ह्याची परिस्थिती चिंताजनक आहे. पुन्हा एकदा आपल्याला बंधन पाळावी लागणार आहे. मुंबईमध्ये रुग्ण डबल झालेत, कोरोनाची दुसरी लाट दरवाज्यावर धडक मारतेय, अशी भीती व्यक्त केली.
कोविडयोद्धा होता नाही आलं तर कोविड दूत तरी होऊ नका. अमरावतीमध्ये हजाराच्या आसपास रुग्ण सापडलेत. ज्यावेळेस कोरोना टोकावर होता तेव्हाही अशी स्थिती नव्हती, असे स्पष्ट केले.
jcQqPRuNgxtJyrB