जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते यांचे निधन
श्रीगोंदा । वीरभूमी - 19-Feb, 2021, 12:00 AM
साई उद्योग समूहाचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य आणि माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांचे बंधू सदाशिव (आण्णा) भिकाजी पाचपुते (वय ६७ वर्षे) यांचे आज शुक्रवार दि. १९ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी २.४० वाजता पुण्याच्या रुबी हॉल मध्ये दुःखद निधन झाले.
सदाण्णा दि. २ फेब्रुवारी २०२१ रोजी कोविड निगेटिव्ह आले होते. कोविड मधून ते बाहेर पडल्यानंतर आज त्यांचा हृदय विकाराने मृत्यू झाला.
त्यांचा अंत्यविधी आज दि.१९ फेब्रुवारी २०२१ रोजी सांयकाळी ७ वा वाजता काष्टी येथील घोड नदीतिरी होणार आहे.
Comments