डॉ. क्षितिज घुले यांच्या प्रयत्नाला यश
उद्धव देशमुख l वीरभूमी - 19-Feb, 2021, 12:00 AM
शिवरायांचे विचार, आचार, आदर्श आणि प्रशासन याचा आंगिकार कारत शेवगाव पंचायत समितीमध्ये विकासाचा झेंडा उभा करत असताना अनेक दिवसापासूनची शिवप्रेमिंची पंचायत समिती पुढील छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्ध पुतळा नवीन इमारतीसमोर स्थलांतरीत करण्याची मागणी आज ती शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांच्या प्रयत्नाने फळाला आली.
पुतळा बसविण्यासाठी १९ फेब्रूवारीचे औचित्य साधत आज पंचायत समितीच्या नवीन इमारती समोर मोठ्या उत्साहात आणि आनंदात अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले यांच्या हस्ते कुदळ टाकुन त्याची सुरुवात करण्यात आली.
जगाला राजा आणि त्याचे विचार कसे असावे, त्यांनी जनतेला काय द्यावे आणि काय नाही. विकासाचा आलेख उभा करत असताना जनतेचा विश्वास, आणि प्रशासन चलवत असताना दाखवलेला करारीबाना या शिवाजी महाराजांच्या विचारांना स्मरून डॉ. क्षितिज घुले यांनी शेवगांव पंचायत समितीचा कारभार केला. याच दरम्यान अनेक दिवसापासूनची शिव प्रेमिंची छ्त्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा नवीन पंचायत समिती समोर हलवण्यासाठीची मागणी होती. यासाठी अनेकानी प्रयत्न केले. परंतु ते यशस्वी झाले नाही. परंतु शिवप्रेमिंच्या मनापासूनच्या ईच्छेखातर त्यांनी अनेक प्रयत्न करत स्थलांतराची परवानगी मिळवली आणि आज मोठ्या दिमाखात पुतळा उभा करण्यासाठी भुमिपुजनाचा कार्यक्रम शिवप्रेमिंच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या नवीन इमारती समोर करण्यात आला.
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती शिवाजीराव नेमाने, पं. स. सदस्य गंगाधर पायघन, मंगेश थोरात, संतोष पावसे, संजय कोळगे, भाऊराव भोंगळे, माऊली खबाले, संभाजी ब्रिगेडचे शरद जोशी, लक्ष्मण गायकेसह पंचायत समितीचे बिडीओ महेश डोके आणि शिवप्रेमी उपस्थित होते.
Comments