पाथर्डी पंचायत समितीत अवतरणार ‘घरकुलाचे मॉडेल’
पाथर्डी । वीरभूमी - 13-Feb, 2021, 12:00 AM
महाआवास अभियान अंतर्गत बांधण्यात येणार्या घरकुलांचे पाथर्डी पंचायत समितीमध्ये मॉडेल उभारण्यात येणार असून याचे भूमिपूजन गोकुळ दौंड, रविंद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या घरकुलांचे काम कमी खर्चात व चांगल्या पद्धतीने करता यावे यासाठी पाथर्डी पंचायत समिती आवारात घरकुलाचे मॉडेल उभारण्यात येणार आहे. या मॉडेल बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, राहुल गवळी, गटविकास अधिकारी शीतल खिंडे, एकनाथ आटकर, पंचायत समितीचे उपअभियंता आर. डी. राठोड, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. दराडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे श्री. सानप, विस्तार अधिकारी दादासाहेब शेळके, विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे, ऋषी पालवे यांच्यासह विविध गावचे ग्रामसेवक, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
महाआवास योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवासची मंजूर असलेली कामे जास्तीत जास्त व लवकरात लवकर पूर्ण करवीत अशा सुचनाही यावेळी ग्रामसेवकांना देण्यात आल्या. पंचायत समितीमध्ये तयार करण्यात येणारे मॉडेल नुसार लाभार्थ्यांनी ग्रामीण भागात घरकुले बांधावीत, असे आवाहन करण्यात आले.
Comments