दिवसभर डोंगर-दर्यांतून फिरूनही बिबट्याचा शोध लावण्यात वनविभाग अपयशी । नागरिकांत भीतीचे वातावरण कायम
पाथर्डी । वीरभूमी - 31-Oct, 2020, 12:00 AM
तीन बालकांचा जीव घेतल्यानंतरही नरभक्षक बिबट्याचा शोध घेण्यात वनविभागाला तिसर्या दिवशीही अपयश आले. जळगाव, औरंगाबाद, नाशिक, नगर व आष्टी येथील पथकांच्या मदतीने पाथर्डी व तिसगाव येथील वनकर्मचारी यांनी दिवसभर डोंगर दर्यातून शोध घेतला. मात्र वरीष्ठ अधिकार्यांच्या योग्य नियोजनाच्या आभावाने बिबट्या चकवा देण्यात यशस्वी झाला. यामुळे नागरिकांच्या मनात भितीची वातावरण काय आहे.
याबाबत तिसगाव वनविभागाचे श्री. वाघुळकर यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी आपले तपासाचे पितळ उघडे पडू नये म्हणुन माहिती देण्याचे टाळले.
मढी, केळवंडी व शिरापूर अशा ठिकाणच्या तीन बालकांचा जीव घेतल्यानंतर वनविभागाने बिबट्या पकडण्यासाठी हालचाली सुरू केल्या. त्यानंतर वनमंत्री राठोड व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या सुचना वनविभागाच्या अधिकार्यांना दिल्या. मात्र मंत्र्यांच्याही सुचना वन अधिकारी गांभिर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. बिबट्याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहे. वनकर्मचारी दिवसभर डोंगर दर्या पायी चालत बिबट्याचा शोध घेत आहेत.
बिबट्याल पकडण्यासाठी गर्भगिरी डोंगर रांगा परिसरात पिंजर्यांची संख्या वाढवली आहे. मात्र दिवसभर शोध घेवूनही बिबट्या कोणत्या भागात आहे, याचा शोध घेण्यात वनविभागाला अपयश आले आहे. वनकर्मचारी वरिष्ठ अधिकार्यांच्या सुचनांचे पालन करतात मात्र वन अधिकारी यांनाच तपासाची दिशा ठरवता येत नसल्याने बिबट्या सापडणे सध्यातरी अवघड दिसत आहे. यामुळे परिसरातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली आपले जीवन जगत आहेत.
Hii