अकोले । वीरभूमी - 29-Jun, 2022, 03:41 PM
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा माउली तुकाराम असा जयघोष करत विठुरायाच्या भेटीसाठी पंढरीकडे निघालेल्या श्री. क्षेत्र अकोले येथील अगस्ती ऋषी महाराज पायी दिंडी सोहळ्याचे राहुरी फॅक्टरी येथील गुरुकुल वसाहतीमध्ये रिंगण सोहळा रंगला. या रिंगण सोहळ्याने सर्वांचे पारणे फेडले. राहुरी फॅक्टरी येथील गुरुकुल वसाहती मधील पावन गणपती मित्र मंडळाच्यावतीने भव्य स्वागत करण्यात आले.
हा आनंद सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. कोरोना महामारीमुळे सलग दोन वर्षे पंढरपूरला जाणार्या पायी दिंडी सोहळे बंद असल्याने यंदा वारकर्यांचा मोठा उत्साह पंढरीकडे जाणार्या दिंडीत पहावयास मिळत आहे.
अकोले येथून अगस्ती देवस्थान ट्रस्ट यांच्या अधिपत्याखाली निघालेल्या अगस्ती ऋषी पायी दिंडीचे राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर नाका चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी अगस्ती ऋषी महाराज पालखीची पूजन माजी उपनगराध्यक्ष तथा आरपीआय जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर भजन, प्रवचन कार्यक्रम व रिंगण सोहळा नूतन माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाले. पावन गणपती मित्र मंडळाच्या वतीने वारकर्यांना महाप्रसाद पंगत देण्यात आली.
यावेळी देवळाली नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा आरपीआय जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, गोपाल शिंदे, विलास अल्हाडे, माजी नगरसेवक सचिन ढुस, माजी नगरसेवक प्रदीप गरड, अरुण गायकवाड, बाळासाहेब भालेराव, संतोष झावरे, अॅड. अजय पगारे, व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील विश्वासराव, योगेश मुसमाडे, सुभाष कोंडेकर, श्री. ढुमणे सर, भाऊसाहेब जाधव, निलेश गायकवाड, प्रसाद काळाने, युवा कीर्तनकार बाबा महाराज मोरे, सोपान सौदागर आदी उपस्थित होते.
अगस्ती देवस्थानचे अध्यक्ष अॅड. के. डी. धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळ्याचे अध्यक्ष राजेंद्र महाराज नवले, दीपक महाराज देशमुख, आत्माराम महाराज शेळके, रामचंद्र महाराज वावळे, किसनदादा नाईकवाडे, विणेश देशमुख यांच्या अधिपत्याखाली दिंडी पंढरीकडे मार्गस्थ झाली.
यावेळी नूतन माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांसह पावन गणपती मित्र मंडळाचे मनोहर निघूते, डॉ. योगेश पगारे, पंकज ढुमने, अक्षय अल्हाडे, तुषार राऊत, अभि राऊत, रोहित काळाने, मनोज अल्हाडे, अर्जुन कराड, ओमकार कोबरने, विठू राऊत, धिरज जगताप, तुषार शेटे आदींनी परिश्रम घेतले.
guSDLdwTFVX