वृद्धेश्वरच्या छाननीमध्ये 30 जणांचे अर्ज अवैध; 73 वैध
रामकिसन काकडे, सुभाष बुधवंत बिनविरोध; इतर जागाही बिनविरोधच्या मार्गावर
पाथर्डी । वीरभूमी- 15-Jan, 2021, 12:00 AM
तालुक्याची कामधेनू असलेल्या श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 19 जागेसाठी तब्बल 103 जणांनी आपले अर्ज दाखल केले होते. या दाखल अर्जाची छाननी होऊन तब्बल 30 जणांचे अर्ज अवैध तर 73 जणांचे अर्ज वैध ठरले. छाननी नंतर पाथर्डी गटातील 2 जागेसाठी रामकिसन काकडे व सुभाष बुधवंत यांचे एकमेव अर्ज राहील्याने या दोन्ही जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर इतर गटामध्ये विरोधकांचे फक्त 10 अर्ज शिल्लक राहीले आहेत.वृद्धेश्वर साखार कारखाना निवडणुकीमध्ये उमेदवारी दाखल करण्याच्या मुदतीत तब्बल 120 अर्ज दाखल झाले होते. या दाखल अर्जाची गुरुवारी छाननी होऊन शुक्रवारी वैध उमेदवारांची नावे प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये तब्बल 30 जणांचे अर्ज अवैध ठरले.
अवैध ठरलेले उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे- कासार पिंपळगाव गट- बापुसाहेब पाराजी पाटेकर. चितळी गट- विष्णू सीताराम सातपुते, लक्ष्मीबाई विष्णुदास भोरडे. कोरडगाव गट- विठ्ठल एकनाथ मुखेकर, मधुकर शंकर देशमुख, महादेव भाऊराव कंठाळी, संभाजी रामभाऊ वारंगुळे, संदीप मारुती पठाडे, संभाजी दिपाजी गर्जे, दिलीप दामोदर देशमुख, अरविंद शिवाजी देशमुख, माणिक वामन दराडे. मिरी गट-आसाराम एकनाथ अकोलकर, बापुसाहेब गोविंद घोरपडे, विजय सयाजी गवळी. टाकळी मानूर गट-अंकुश भानुदास कासुळे, गहिनीनाथ लक्ष्मण थोरे, गहिनाथ पाटीलबा ढाकणे, भरतकुमार अंबादास दहिफळे. अनुसूचित जाती-जमातीचा प्रतिनिधी- नंदकिशोर पांडुरंग एडके, भागुबाई बाजीराव कटारनवरे. महिला प्रतिनिधी- सुनंदा बाबासाहेब गर्जे, रत्नप्रभा शेषराव कचरे, लक्ष्मीबाई विष्णू भोरडे, इतर मागास वर्ग- बापुसाहेब दिनकर पाटेकर, नारायण दिनकर पाटील, अंकुश भानुदास कासुळे, भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी- देवराव बाजीराव शेंडे, भरतकुमार अंबादास दहिफळे, लक्ष्मण किसन हंडाळ असे 30 जणांचे अर्ज अवैध ठरले आहेत.
तर वैध ठरलेल्या उमेदवारांमध्ये- कासार पिंपळगाव गट (2 जागेसाठी 9 अर्ज)- आप्पासाहेब दादाबा राजळे, उद्धवराव रघुनाथ वाघ, अमोल अच्युतराव वाघ, राहुल आप्पासाहेब राजळे, मोनिका राजीव राजळे, सुनील रघुनाथ काजळे, अर्जुन दादाबा राजळे, भाऊसाहेब मळू उघडे, चारुदत्त उद्धवराव वाघ.
चितळी गट (3 जागेसाठी 11 अर्ज)- बाळासाहेब कारभारी कचरे, अनिल शिवाजी फलके, वच्छलाबाई कारभारी कचरे, साहेबराव गोपीनाथ सातपुते, अॅड. विष्णू कस्तुरबा भोरडे, राम किसन कचरे, शंकर नामदेव भिसे, शेषराव सूर्यभान कचरे, सुभाष बाबुराव ताठे, बाजीराव आश्राजी गर्जे, अरुणराव किसन आहेर,
कोरडगाव गट (2 जागेसाठी 4 अर्ज)- श्रीकांत एकनाथ मिसाळ, शाळीग्राम बबन वीर, बाबासाहेब रंगनाथ किलबिले, साहेबराव बाजीराव देशमुख.
पाथर्डी गट (2 जागेसाठी 2 अर्ज)- रामकिसन काशिनाथ काकडे, सुभाष मारुती बुधवंत.
मिरी गट (2 जागेसाठी 8 अर्ज)- शरद हरिभाऊ अकोलकर, निर्मला बापुसाहेब मचे, गंगाधर सोनाजी शिंदे, यशवंतराव निवृत्ती गवळी, बाबासाहेब बलभिम मचे, भगवान शंकर म्हस्के, रेवननाथ मोहन वाबळे, राजेंद्र निवृत्ती गवळी.
टाकळी मानूर गट (2 जागेसाठी 14 अर्ज)- गोरक्ष कारभारी फुंदे, बाबासाहेब आश्रुबा गर्जे, कालिदास उमाजी दहिफळे, सिंधुबाई महादेव जायभाये, काशिबाई बाळासाहेब गोल्हार, बाळासाहेब भगवान गोल्हार, रामकिसन पाराजी शिरसाट, त्रिंबक हरिभाऊ खेडकर, बाळासाहेब साहेबराव खेडकर, भगवान नामदेव दहिफळे, भिवसेन गेणू खेडकर, शेषराव सूर्यभान ढाकणे, माणिक कोंडीबा खेडकर, बाबासाहेब उत्तम ढाकणे,
कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद सहकारी संस्था व बिगर उत्पादक संस्था सभासदांनी निवडून द्यावयाचा प्रतिनिधी (1 जागेसाठी 3 अर्ज)- आप्पासाहेब दादाबा राजळे, मोनिका राजीव राजळे, राहुल आप्पासाहेब राजळे.
अनुसूचित जाती-जमातीचा प्रतिनिधी (1 जागेसाठी 4 अर्ज)- चंद्रकांत भगवान पाचरणे, अंबादास धोंडिबा बळीद, काकासाहेब मुरलीधर शिंदे, नागेश्वर आदिनाथ कांबळे,
महिला प्रतिनिधी (2 जागेसाठी 8 अर्ज)- विद्या बाबासाहेब म्हस्के, सिंधूबाई महादेव जायभाये, उषाताई पांडुरंग खेडकर, मोनिका राजीव राजळे, वच्छलाबाई कारभारी कचरे, कडूबाई धोंडीराम कांबळे, सिंधुबाई पोपट बडे, द्वारकाबाई अरुणराव आहेर.
इतर मागास वर्ग (1 जागेसाठी 5 अर्ज)- अॅड. विष्णु कस्तुरबा भोरडे, बाबासाहेब रंगनाथ किलबिले, बाबासाहेब कोंडीबा बर्डे, कुशिनाथ खंडू बर्डे, अमोल अच्यूतराव वाघ,
भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी (1 जागेसाठी 5 अर्ज)- भाऊसाहेब मळू उघडे, कोंडीराम रामजी नरोटे, नामदेव उमाजी सोलाट, शेषराव सूर्यभान ढाकणे, बाबासाहेब आश्रू गर्जे. असे तब्बल 73 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. आता दि. 1 फेब्रुवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
Tags :
xrueCURDLksbmFa