डॉ. दिपक परदेशी यांनी कोरोना लस टोचुन घेत ईतर कर्मचाऱ्यांना दिला आधार
वीरभुमी- उद्धव देशमुख 16-Jan, 2021, 12:00 AM
कोरोना विरोधी लसीचे संपुर्ण देशात आज मोफत लसीकरण सुरू झाले असताना आज शनिवार दि. १६ रोजी शेवगांव तालुक्यातील आरोग्य विभागातील कोरोना योद्ध्याना प्रथम लस देण्यात आली यामध्ये ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.दिपक परदेशी यानी ईतर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वप्रथम स्वतःला लस टोचुन घेत दिला आधार.
शेवगाव तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचारी यांचे लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन आज सकाळी मान्यवरांच्या हस्ते ग्रामीण रूग्णालय, शेवगाव याठिकाणी करण्यात आले. यावेळी शेवगांव चे डि वाय एस पि. सुदर्शन मुंडे, शेवगांव पंचायत बिडीचे प्रभारी गटविकास अधिकारी कासार, रोटरी क्लबचे अध्यक्ष किसन माने, मेडिकल अशोशिएशनचे अध्यक्ष डॉ विकास बेडके, बोधेगाव येथील डॉ यां भिसे, उपस्थित होते पहीली लस स्वतःला टो
चुन घेण्यासाठी डॉ. परदेशी यांनी पुढाकार घेऊन इतर कर्मचारी वर्गाला मानसिक बल देण्याचे काम केल्याने त्यांचे शेवगांव तालुक्यात कौतुक होत आहे.....
Comments