लोणी येथे आढळला मृत कावळा
लोणी । वीरभूमी - 21-Jan, 2021, 12:00 AM
राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक गावातील लोणी सादतपुर रस्ता प्रवरा मेडिकल ट्रस्ट मागील बाजूस जालिंदर रामनाथ विखे यांच्या वस्तीवर आज एक कावळा मृत आढळून आला. त्यांनी लगेच स्थानिक वन्यजीव प्राणीमित्र विकास म्हस्के यांना फोन करून माहिती दिली.
बर्ड फ्लू च्या पार्श्वभूमीवर आज मृत कावळा आढळून आल्याने जालिंदर विखे घाबरून गेले. त्यांनी झेडपी चे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. दशरथ दिघे व प्राणीमित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच डाॅ. दिघे व प्राणीमित्र म्हस्के तात्काळ घटनास्थळी पोहोचले व मृत कावळ्याला पॅक करून रोग अन्वेषण प्रयोगशाळा पुणे येथे पुढील तपासणी साठी पाठवला.
प्राणीमित्र विकास म्हस्के म्हणाले की हि लोणी परिसरातील पहिलीच घटना आहे तरी कृपया कोणीही घाबरून जाऊ नये व असे पोपट, कोंबड्या, कावळे व इतर पक्षी मृत आढळल्यास त्यांना स्पर्श करू नये व तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. दशरथ दिघे व प्राणीमित्र विकास म्हस्के यांना संपर्क करावा.
पुण्याच्या रोग अन्वेषण प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालानंतरच कावळ्याचे मृत्यू चे कारण स्पष्ट होईल. त्यात काही आढळले तर सॅम्पल भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवला जाईल.पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. दशरथ दिघे व प्राणीमित्र विकास म्हस्के यांना संपर्क करावा.
पुण्याच्या रोग अन्वेषण प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालानंतरच कावळ्याचे मृत्यू चे कारण स्पष्ट होईल. त्यात काही आढळले तर सॅम्पल भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवला जाईल.
gtyIaphOJGDeMjXq